⁠  ⁠

SSC : स्टाफ सिलेक्शन कमिशनमार्फत नवीन मेगा भरती, 12वी उत्तीर्णांना सरकारी नोकरीची संधी..

Chetan Patil
By Chetan Patil 2 Min Read
2 Min Read

SSC Stenographer Recruitment 2022 : बारावी पास उमेदवारांना नोकरीची मोठी संधी चालून आलीय. कर्मचारी निवड आयोग, SSC ने SSC स्टेनोग्राफर C & D परीक्षा २०२२ साठी अधिकृत अधिसूचना जारी केली आहे. अधिकृत अधिसूचनेनुसार, त्यासाठी नोंदणी प्रक्रिया आजपासून म्हणजेच 20 ऑगस्ट 2022 पासून सुरू होईल आणि नोंदणी करण्याची अंतिम तारीख 5 सप्टेंबर 2022 आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा.

एकूण जागा : पद संख्या तूर्तास निर्दिष्ट नाही.

पदाचे नाव :
1) स्टेनोग्राफर, ग्रेड ‘C’ (ग्रुप ‘B’)
2) स्टेनोग्राफर, ग्रेड ‘D’ (ग्रुप ‘C’)

शैक्षणिक पात्रता: उमेदवारांनी मान्यताप्राप्त बोर्ड किंवा विद्यापीठातून 12 वी किंवा समकक्ष परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी.

वयो मर्यादा :
वयोमर्यादेबद्दल बोलायचे तर स्टेनोग्राफर ग्रेड सी साठी उमेदवाराचे वय किमान १८ वर्षे असावे. आणि कमाल वयोमर्यादा 30 वर्षे ठेवण्यात आली आहे. स्टेनोग्राफर ग्रेड डी साठी, उमेदवाराचे वय किमान 18 वर्षे असावे. आणि कमाल वयोमर्यादा 27 वर्षे ठेवण्यात आली आहे. उमेदवारांचे वय 1 जानेवारी 2022 पासून मोजले जाईल.

परीक्षा फी : अर्ज फीबद्दल बोलायचे झाल्यास, उमेदवारांना 100 रुपये शुल्क भरावे लागेल. महिला उमेदवार आणि अनुसूचित जाती (SC), अनुसूचित जमाती (ST), अपंग व्यक्ती (PWD) आणि माजी सैनिक (ESM) मधील उमेदवारांना पेमेंटमधून सूट देण्यात आली आहे.

परीक्षा पद्धती : एसएससी स्टेनोग्राफ परीक्षा तीन भागांमध्ये विभागली जाते. 1- सामान्य ज्ञान आणि तर्क, 2- सामान्य जागरूकता आणि 3- इंग्रजी भाषा आणि आकलन. पहिल्या भागाची परीक्षा 2 तास 40 मिनिटांची असेल, ज्यासाठी 50 गुण निश्चित केले आहेत. त्याच वेळी, परीक्षेचा दुसरा भाग 2 तास 40 मिनिटे चालेल आणि त्यासाठी 50 गुण निश्चित केले आहेत. तर तिसऱ्या भागाची परीक्षा १०० गुणांची असेल.

अर्ज करण्याची शेवटची तारीख: 05 सप्टेंबर 2022 (11:00 PM)
परीक्षा (CBT): नोव्हेंबर 2022
अधिकृत संकेतस्थळ : ssc.nic.in

जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक करा

Share This Article