⁠  ⁠

नगरमधील गणेशची सशस्त्र सीमा दलात पोलिस उपनिरीक्षक पदी नियुक्ती !

Chetan Patil
By Chetan Patil Add a Comment 1 Min Read
1 Min Read

आपल्याला स्वप्न पूर्ण करण्यासाठी दिवसरात्र मेहनत करण्याची देखील तयारी हवी. तसेच या मेहनतीसाठी जिद्द, चिकाटी उराशी असणे गरजेचे आहे. हीच जिद्द मात्र गणेश यांनी बाळगली आणि त्याचे स्वप्न पूर्ण झाले.भारत सरकारच्या स्टाफ सिलेक्शन कमिशनव्दारे घेण्यात आलेल्या परीक्षेतून नगरमधील बालिकाश्रम रोडवरील गणेश सपकाळे यांची केंद्र सरकारच्या सशस्त्र सीमा दलात पोलिस उपनिरीक्षक पदी निवड झाली आहे. गणेश सपकाळे हे जिल्हा परिषदेतील सहायक लेखाधिकारी राधेश्याम सपकाळे यांचे चिरंजीव.

त्याचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण नगरमधील सेक्रेड हार्ट कॉन्व्हेन्ट हायस्कूल येथे झाले. अकरावी व बारावीचे शिक्षण औरंगाबाद येथील सैनिकी प्रशिक्षण संस्था येथे झालेले आहे. त्यांनी भौतिकशास्त्र विषयात पुणे येथे पदव्युत्तर शिक्षण घेतले. आयआयटी चेन्नई येथे उच्च शिक्षण घेत असतानाच त्याने स्पर्धा परीक्षेचा अभ्यास सुरू‌ केला होता. त्या प्रयत्नांना त्याला यश आले आहे. स्टाफ सिलेक्शन कमिशनची परीक्षा देत त्यात यश मिळविले आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ऑनलाईन उपस्थितीत झालेल्या रोजगार मेळा कार्यक्रमात पुणे येथे सपकाळे यांना नियुक्तीपत्र मिळाले.

मित्रांनो, शिक्षण घेताना देखील स्पर्धा परीक्षेचा अभ्यास केल्यास यश मिळू शकते.‌त्याचे गणेश‌ हे उत्तम उदाहरण.

Share This Article
Leave a comment