⁠  ⁠

लहानपणीच वडील वारले पण अतुलने जिद्दीने करून दाखवले !

Chetan Patil
By Chetan Patil 1 Min Read
1 Min Read

खरंतर, आपली परिस्थिती हीच आपली ताकद बनते.अतुल आडे हा जिल्ह्यातील हिमायतनगर तालुक्यातील वायवाडी तांडा येथील रहिवासी आहे. लहानपणीच त्याचे वडील वारले.अकरावीत शिकत असताना अतुलच्या वडिलांच निधन झालं.वडील आपल्याला सोडून गेले तेव्हा आई एकटी कशी राहणार? म्हणून पुणे सोडण्याचा विचार केला आणि घरी परतले.

पुढे शिक्षण घेऊन कोणती तरी छोटी मोठी पोस्ट मिळवावी अशा अपेक्षेने अतुल पळसगाव तांडा येथे आपल्या मावशीकडे शिक्षण घेण्यासाठी गेला.एक वर्ष रेल्वेनं हिमायतनगर ते नांदेड अप- डाऊन प्रवास केला. आईनं देखील शेतात मोलमजुरी करून मुलाला शिकवलं. मित्रांचीही त्याला साथ मिळाली. त्याने पदवी शिक्षण पूर्ण केल्यानंतर स्पर्धा परीक्षेची तयारी करायला सुरुवात केली. अहोरात्र मेहनत घेतली यात कुटुंब आणि मित्रांची साथ मिळाली.घरची परिस्थिती अत्यंत हालाखीची असल्याने अंकुश आणि अतुल हे दोघे भाऊ पुण्यात कंपनीमध्ये काम करत होते.

नोकरी करत उदरनिर्वाह केला आणि अभ्यास देखील तेवढाच केला. त्याच्या या प्रयत्नांना यश आले.जिद्द, मेहनत आणि मित्राच्या सहकार्याने अतुलने पहिल्याच प्रयत्नात पोलीस उपनिरीक्षक पदाला गवसणी घातली आहे.आई-वडिल आपल्या मुलांना मोठं करतना अपार कष्ट घेतात आणि मुलांना चांगलं शिक्षण देतात. हेच कष्ट डोळ्यासमोर ठेऊन काही मुलं मात्र आई-वडिलांचं नाव मोठं करतात.

Share This Article