⁠
Inspirational

मोनिकाने एक-दोन नव्हे, तब्बल चौथ्यांदा स्पर्धा परीक्षेत मिळविले यश

Success Story बिकट परिस्थिती मध्येही सुकर वाट शोधता येते. पर्वती दर्शन मधील वडील सफाई कर्मचारी असताना मोनिका कांबळे हिने स्पर्धा परीक्षेमध्ये सलग चौथ्यांदा यश संपादन करीत तहसीलदार पद मिळवले आहे.

जीवनात यशस्वी होण्यासाठी भोवतालचे वातावरण अनुकूल असावे लागते असे काही नसते.जिद्दीने व प्रामाणिकपणे कठोर अभ्यास केल्यास यश हमखास मिळते.हे मोनिका कांबळे हिने दाखवून दिले आहे. स्पर्धा परीक्षेची तयारी करत असताना विद्यार्थी दशेत असतात परीक्षेत खचून न जाता सातत्याने जिद्द व चिकाटीने अभ्यास केल्यास हमखास यश मिळते. मोनिकाचे संपूर्ण शैक्षणिक प्रवास हा सहकारनगर मध्येच झाला.

तिने यापूर्वी 2018 मध्ये कर निर्धारण प्रशासकीय अधिकारी (उप मुख्याधिकारी) तर 2019 मध्ये राज्य विक्रीकर निरीक्षक म्हणून निवड झाली होती. 2020 मध्ये उपशिक्षणाधिकारी म्हणून निवड झाली, तर 2021 मध्ये तहसीलदार पदी निवड झाली. अशी सलग 2018 ते 2021 चौथ्यांदा स्पर्धा परीक्षेत यश संपादन करीत स्पर्धा परीक्षेत यश मिळवले आहे. सध्या ती तहसीलदार म्हणून रुजू झाली आहे. तर यापुढे असाच स्पर्धा परीक्षेचा अभ्यास चालू ठेऊन यूपीएससी परीक्षा देऊन जिल्हाधिकारी होण्याचे मोनिकाचे स्वप्न आहे.

Related Articles

Back to top button