⁠  ⁠

राहायला एकच पत्र्याची खोली, हलाखीच्या परिस्थितीवर मात करून शिवम बनला पोलिस उपअधीक्षक..

Chetan Patil
By Chetan Patil 2 Min Read
2 Min Read

घरची परिस्थिती बेताची, राहायला एकच पत्र्याची खोली,कुटुंबाला अवघी एक गुंठाही शेतजमीन नाही.. अशा हलाखीच्या परिस्थिती देखील कराड तालुक्यातील चरेगाव येथील २६ वर्षीय शिवम विसापूरे याने थेट पोलिस उपअधिक्षक पदाला गवसणी घातली आहे.

शिवमची आई छाया विसापुरे या आशा सेविका म्हणूनही काम करतात. शाळेत शालेय पोषण आहार देखील तयार करण्यासाठी त्या जातात. शिवम चे वडिल दत्तात्रय विसापूरे यांनी तासवडे एम.आय.डी.सी मध्ये नोकरी केली. काही काळ त्यांची नोकरी ही गेली. त्यावेळी आईने संपूर्ण संसाराची जबाबदारी खांद्यावर घेत संसाराचा गाडा ओढला. प्रामाणिक प्रयत्न व जोडीला कष्ट असले तर दिवस बदलतात. हे डोक्यात ठेऊन या कुटूंबाने आर्थिक प्रगती केली. त्यांनी मुलाला देखील उच्च शिक्षित केले.

शिवमने प्राथमिक शिक्षण चरेगाव येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत तर तर माध्यमिक शिक्षण रयत शिक्षण संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कुल मध्ये घेतले. कराडच्या शासकीय अभियांत्रिकी कॉलेज मधून त्याने मॅकेनिकल इंजिनिअरिंगमधून डिप्लोमा पूर्ण केले आणि नंतर पुणे येथील कॉलेज मधून मॅकेनिकल इंजिनिअरिंगची डिग्री घेतली आहे.

पण या सगळ्यात आर्थिक चणचण कायम भासत होती. त्यामुळे त्याने ही परिस्थिती कधी ना कधी बदलायला हवी या विचाराने शिवमने शासकीय अधिकारी ठरवले. त्याने पुण्यात राहून महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या स्पर्धा परीक्षेची तयारी सुरू केली. पहिल्या प्रयत्नात अपयश आले. मात्र, दुसऱ्या प्रयत्नात शिवम नायब तहसीलदार बनला. तिसऱ्या प्रयत्नात पोलीस उपअधिक्षक झाला.

मित्रांनो, आपली परिस्थिती कायम तशीच राहत नाही तर ती बदलता येते. पण त्यासाठी मेहनत गरजेची असते.

Share This Article