इंदूर येथे सुरू असलेल्या राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत ७४ किलो वजनी गटात भारताचा ऑलिम्पिक पदकविजेता कुस्तीगीर सुशील कुमारने सुवर्णपदक जिंकले. त्याच्या दोन प्रतिस्पर्ध्यांनी आपल्यापेक्षा सरस अशा या खेळाडूला सन्मान देण्यासाठी लढतीतून माघार घेतली. महिलांमध्ये ऑलिम्पिक पदकविजेती साक्षी मलिक व गीता फोगाट यांनीही आपापल्या वजनी गटात सहज सुवर्णपदके जिंकली. गीताने ५९ किलो वजनी गटात सरिताला ८-४ असे नमविले तर साक्षीने आपल्या अंतिम सामन्यात ६२ किलो वजनी गटात आपली प्रतिस्पर्धी खेळाडू पूजा तोमरला १०-० असे सहज पराभूत केले. रेल्वेतून खेळत असलेल्या उत्कर्ष काळेने ५७ किलो वजनी गटात सुवर्णपदक जिंकले. त्याने आपल्या लढतींत प्रवीण कुमार, विकी, महेक चौधरी, महिपती आणि अंतिम फेरीत रविकुमार यांना नमविले.
---Advertisement---
LATEST Post
Published On:
Published On:
Published On: