न्यूझीलंडच्या वैज्ञानिकांनी जगातील पहिला असा रोबोट विकसित केला आहे, जो नेता बनेल. राजकारणात पारदर्शकता आणण्यासाठी त्याला २०२० मध्ये न्यूझीलंडमध्ये होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकीत उमेदवार करण्याची तयारी सुरू झाली आहे. या यांत्रिकी नेत्याचे नाव ‘सॅम’ (एसएएम) आहे. न्यूझीलंडचे ४९ वर्षीय उद्योगपती निक गॅरिट्सन यांनी तो विकसित केला आहे. न्यूझीलंडमध्ये २०२० अखेर सार्वत्रिक निवडणूक होईल. तेव्हा सॅम उमेदवार म्हणून दावा सादर करू शकेल.’ दुसरीकडे ‘टेक इन आशिया’ने अहवालात म्हटले आहे की, प्रणाली भलेही पूर्णपणे अचूक नाही, पण अनेक देशांत वाढते राजकीय आणि सांस्कृतिक अंतर भरण्यासाठी मदतीची ठरू शकेल.
सॅम चॅटबोट आहे. सध्या त्याला कायदेशीर वैधता मिळाली नाही. तो फेसबुक मेसेंजरद्वारे लोकांना प्रतिक्रिया देणे शिकत आहे. प्रयोग म्हणून या रोबोटवर न्यूझीलंडशी संबंधित योजना, धोरणे आणि तथ्यांशी संबंधित प्रश्न विचारण्यासाठी लोकांना यादीतून दिलेल्या प्रश्नांच्या पर्यायाची निवड करावी लागते. सॅम त्या प्रश्नांची निश्चित संकल्पना आणि लोकांच्या मतांच्या आधारे उत्तर देत आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता असलेल्या या रोबोट नेत्याने अलीकडेच घर, शिक्षण, व्हिसासंबंधी धोरणे आणि स्थानिक मुद्द्यांवर विचारलेल्या प्रश्नांची योग्य उत्तरे दिली.
सौदीत रोबोटला मिळाले आहे नागरिकत्व
सौदी अरेबियात एक महिन्यापूर्वीच सोफिया या महिला रोबोटला नागरिकत्व मिळाले आहे. ती लोकांशी चर्चाही करू शकते. या रोबोटला अरब देशांतील कोणत्याही सामान्य महिलेपेक्षा जास्त अधिकार आहेत.