---Advertisement---

वडिलांनी सायकलवर विकले कपडे, पण मुलगा बनला IAS !

By Chetan Patil

Published On:

---Advertisement---

UPSC IAS Success Story : आपल्या मेहनतीचे कधी ना कधी फळ मिळतेच. तसेच अनिल बसाक भारतीय महसूल सेवेत (IRS) स्थान मिळवून AIR-616 वा मिळवला. मात्र, बसाक आयएएस अधिकारी होण्यावर ठाम होते आणि त्यांनी तिसऱ्यांदा आणखी एक प्रयत्न केला. आयएएस अधिकारी होण्याचे त्यांचे स्वप्न पूर्ण झाले.जर तुम्ही कठोर परिश्रम केले नाहीत आणि जीवनातील अडथळे आणि आव्हानांवर मात केली नाही तर यशाला काही अर्थ नाही. जर तुम्हाला एखादी गोष्ट हवी असेल तर त्यासाठी तुम्हाला कठोर परिश्रम करावे लागतेच आणि तुमचे सर्वस्व द्यावे लागेल. जीवनात मोठे यश मिळवण्याची ही गुरुकिल्ली असल्याचे दिसते.त्यासाठी मेहनत घेतली तर यशाची चव अधिक गोड असते. अशीच एक प्रेरणादायी कहाणी आहे IAS अनिल बसाक यांची ज्यांनी IAS अधिकारी होण्यासाठी सर्व अडचणींचा सामना केला. रस्त्याच्या कडेला कापड विक्रेत्याचा मुलगा असूनही, IAS अनिल बसाक यांनी आपल्या जिद्दीने सर्वोच्च शिखर गाठले.

अनिल बसाक हे मूळचे बिहारचे. बसाक‌ यांचे वडील कपडे विकण्यासाठी अनेकदा सायकलवरून गावोगावी जात असतं. कुटुंबाची परिस्थिती बेताची. पण अनिल हे शालेय जीवनापासूनच हुशार विद्यार्थी असल्याने त्याच्या वडिलांनी त्यास शिक्षणासाठी प्रोत्साहन दिले.

---Advertisement---

त्याने दहावी आणि बारावी नंतर प्रतिष्ठित अशा इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (IIT), दिल्लीमध्ये प्रवेश मिळवला. कठोर परिश्रम आणि अभ्यासाच्या जोरावर आयआयटी दिल्लीत प्रवेश घेतला. आयआयटी दिल्लीतून उत्तीर्ण झाल्यानंतर लगेचच त्याने यूपीएससी उत्तीर्ण करण्याचा निर्णय घेतला. आयएएस अधिकारी होण्याचे त्यांचे बालपणीचे स्वप्न होते. मात्र, त्यांच्या पहिला प्रयत्न ते प्रीलिम्स क्लिअर करू न शकले नाही. त्यानंतर त्याने आत्मपरीक्षण केले आणि त्याच्या दुसऱ्या प्रयत्नासाठी अभ्यास केला. त्यांच्या मेहनतीचे शेवटी फळ मिळाले आणि त्यांनी भारतीय महसूल सेवेत (IRS) स्थान मिळवले.

अनिल यांस आयएएस अधिकारी होण्यावर ठाम विश्वास होता. तिसऱ्यांदा आणखी एक प्रयत्न केला.अखेर, आयएएस अधिकारी होण्याचे त्यांचे स्वप्न पूर्ण झाले. त्यांच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती अत्यंत कठीण होती. आयुष्याने जितकी परीक्षा घेतली, तितकीच आयुष्यात काहीतरी मोठे करण्याचे आणि नशीब बदलण्याचे त्यास बळ दिले. अनिल नेहमी ज्या पदावर पोहोचला आहे त्याचे श्रेय त्याचे वडील आणि प्राथमिक शाळेतील शिक्षकाला देतात.

Join WhatsApp Group

Join Now

Join Telegram Channel

Join Now

Related Posts