⁠  ⁠

गुगलची नोकरी सोडून घेतला स्पर्धा परीक्षेचा धाडसी निर्णय; तीनदा अपयशी ठरून चौथ्या प्रयत्नात झाले IAS अधिकारी !

Chetan Patil
By Chetan Patil 2 Min Read
2 Min Read

UPSC IAS Success Story युपीएससी परीक्षा ही सर्वात कठीण परीक्षा मानली जाते. या परीक्षेत दरवर्षी, लाखो विद्यार्थी बसतात. पण फक्त काहीच विद्यार्थी ही परीक्षा उत्तीर्ण होतात असाच एक आयएएस अधिकारी तेलंगणाचा रहिवासी अनुदीप दुरीशेट्टी आहे. जो यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण होण्याच्या आणि आयएएस अधिकारी होण्याच्या प्रयत्नात तीनदा अपयशी ठरला. पण अनुदीप दुरीशेट्टीने २०१७ त्यांनी मध्ये यूपीएससी परीक्षेत टॉप करून आयएएस अधिकारी बनले. २०१७च्या युपीएससीच्या परीक्षेत, २०२५ पैकी ११२६ गुण मिळवून पहिला क्रमांक मिळवला. आतापर्यंत अनुदीप दुरीशेट्टीने यूपीएससी परीक्षेत सर्वाधिक गुण मिळवले आहेत.

दुरीशेट्टी हे तेलंगणातील जगत्याल येथील मेटपल्ली शहरातील आहेत. त्यांनी आपले शालेय शिक्षण श्री. सूर्योदय हायस्कूल आणि श्री.चैतन्य कनिष्ठ महाविद्यालयातून पूर्ण केले. दुरीशेट्टी यांनी २०११ मध्ये बी.आय.टी.एस पिलानी, राजस्थान येथून इलेक्ट्रॉनिक्स आणि इन्स्ट्रुमेंटेशनमध्ये बी.टेक पूर्ण केले आहे.
अनुदीप दुरीशेट्टीचे वडील डी मनोहर हे तेलंगणा नॉर्दर्न पॉवर डिस्ट्रिब्युशन कंपनीमध्ये सहाय्यक विभागीय अभियंता आहेत आणि त्यांची आई ज्योती गृहिणी आहे. घरचे‌ वातावरण चांगले असल्याने त्यांना घरच्यांचा नेहमीच पाठिंबा मिळाला.

त्यांनी पिलानीमधून अभियांत्रिकी शिक्षण पूर्ण केल्यानंतर, अनुदीप दुरीशेट्टी यांनी गुगल सारख्या नामांकित कंपनीत सॉफ्टवेअर अभियंता म्हणून काम केले. याच दरम्यान त्यांना वाटले की आपण आता स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणे गरजेचे आहे. त्यामुळे त्यांनी गलेलठ्ठ पगाराची नोकरी सोडून युपीएससी परीक्षेचा अभ्यास करण्याचा निर्णय घेतला. कोणत्याही प्रशिक्षणाशिवाय युपीएससीची परीक्षा उत्तीर्ण करण्यात अनुदीप यशस्वी झाले. ह्या परीक्षेची तयारी करताना मार्गदर्शनासाठी इंटरनेटची मदत घेतली. ते फक्त उत्तीर्ण झाले नाहीतर त्यांनी आयएएस अधिकारी बनून प्रथम क्रमांक पटकावला.

Share This Article