---Advertisement---

अभिमानाची गोष्ट; रिक्षा चालकाच्या मुलाने मिळवले आयएएस पद !

By Chetan Patil

Published On:

---Advertisement---

UPSC IAS Success Story कोणतीही पार्श्वभूमी नसताना जेव्हा स्वतःच्या हिंमतीवर काहीतरी स्वप्न बघतो. त्या धाडसी प्रवासामुळे नक्कीच यश मिळते. आयएएस गोविंद जयस्वाल (IAS Govind Jaiswal) हे असेच एक उदाहरण आहे. ज्यांनी यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण केली आणि आयएएस अधिकारी हे पद मिळवले. आयएएस जैस्वाल यांची कहाणी प्रेरणादायी आहे. त्यांनी शून्यातून विश्व निर्माण केले आणि आर्थिक परिस्थितीशी सामना करत प्रशासकीय पद मिळवले.

गोविंद यांचे लहानपणापासून आयएएस अधिकारी होण्याचे स्वप्न होते. ते मूळचा वाराणसीचा आहेत. त्याचे वडील बऱ्याच रिक्षांचे मालक होते आणि मेहनतीने त्यांनी ३६ रिक्षा विकत घेतल्या होत्या. गोविंद यांची आई आजारी पडेपर्यंत सर्वकाही ठीक होता. तिच्या उपचारासाठी गोविंदच्या वडिलांना त्यांच्या २० रिक्षा विकल्या गेल्या, तरीही त्यांची आई वाचली नाही तिचे १९९५ मध्ये निधन झाले. आर्थिक परिस्थिती बिघडली. पण त्यांनी आपल्या मुलाला आर्थिक अडचण होऊ दिली नाही आणि गोविंदच्या अभ्यासाचा खर्च भागवण्यासाठी त्याच्या आणखी १५ रिक्षा विकल्या.

आता गोविंदच्या वडिलांकडे फक्त एकच रिक्षा उरली होती, जी त्यांनी आपल्या मुलाच्या शिक्षणासाठी स्वतः चालवायला सुरुवात केली. गोविंद आता मोठा मुलगा झाला होता. शालेय आणि महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केल्यानंतर, तो आता एक मोठे ध्येय बाळगत होता आणि यूपीएससी परीक्षेच्या तयारीसाठी योग्य मार्गदर्शन करण्यासाठी त्याला दिल्लीला यायचे होते.

वडिलांच्या पाठिंब्यामुळे त्यांनी रात्रंदिवस अभ्यास केला आणि कठोर परिश्रम केले. अखेर, त्याने २००६मध्ये पहिल्याच प्रयत्नात युपीएससी परीक्षा ऑल इंडिया रँक (AIR) ४८सह उत्तीर्ण केली.

Join WhatsApp Group

Join Now

Join Telegram Channel

Join Now

Related Posts