---Advertisement---

याला म्हणतात जिद्द! तब्बल 8 वेळा अपयश आले; पण जिद्द सोडली नाही, शेवटी UPSC परीक्षेत मिळविले यश

By Chetan Patil

Published On:

---Advertisement---

UPSC Success Story : संपूर्ण देशभरात यूपीएससी आणि एमपीएससी या स्पर्धा परीक्षांची तयारी लाखो विद्यार्थी करत असतात. परंतु या परीक्षेत प्रत्येकालाच यश मिळते असे नाही, परंतु जिद्दीने आणि अथांग मेहनतीने अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्याला यश नक्कीच मिळते. मात्र त्यासाठी स्वतःवर विश्वास असणे व आपल्या ध्येयप्राप्तीसाठी लढत राहणे महत्त्वाचे असते. याचेच उत्तम उदाहरण म्हणजे वैभव छाबडा.

वैभव छाबडा यांना शालेय जीवनापासूनच अभ्यासात फारशी रुची नव्हती. ते त्यांचा जीवन प्रवास सांगत असताना म्हणतात, की त्यांना शिक्षणामध्ये अजिबात रस न होता, व ते आधीपासूनच बॅकबेंचर होते. साधे बी टेक करण्यासाठी त्यांना पाच वर्षे लागली होती.

कोणतीही गोष्ट करताना अपयश आल्यास, अनेक जन ते सोडून देतात. परंतु युपीएससी सारख्या अवघड मानल्या जाणाऱ्या स्पर्धेत वैभव छाबडा यांना, तब्बल आठ वेळा नापास झाले, परंतु त्यांनी सातत्यानी मेहनत घेत 2018 साली परीक्षेत 32 वा क्रमांक मिळवला. त्यांनी बीटेक केल्या नंतर एका कोचिंगच्या इन्स्टिट्यूटमध्ये फिजिक्स विषयाचे शिक्षक म्हणून नोकरी केली, शिक्षकाची नोकरी करत असताना त्यांच्या मनात यूपीएससी परीक्षा देण्याचा विचार आला, त्यानंतर त्यांनी ते नोकरी सोडून यूपीएससीची तयारी सुरू केली.

यादरम्यान त्यांचा अपघात झाला जात त्यांना पाठीला दुखापत झाली होती व डॉक्टर आणि त्यांना बेड्रेस सांगितला होता. आजारपणात देखील वैभव छाबडा यांनी त्यांचा अभ्यास सातत्याने सुरूच ठेवला व अखेर 2018 मध्ये त्यांच्या कष्टाला यश प्राप्त झालं.

Join WhatsApp Group

Join Now

Join Telegram Channel

Join Now

Related Posts