नऊ तास नोकरी करूनही स्पर्धा परीक्षेचा चिकाटीने अभ्यास केला अन् काजल बनली आयएएस अधिकारी !
प्रत्येकाचे स्वप्न असते की आपण लाल दिव्याच्या गाडीतून फिरायचे, सामाजिक जाण ठेवून काम करायचे आणि प्रशासकीय अधिकारी व्हायचे. असेच स्वप्न उराशी बाळगून काजल देखील जिद्दीने प्रशासकीय अधिकारी झाली.
काजल जावला ही मेरठ, उत्तर प्रदेशची रहिवासी आहे. तिने २०१० मध्ये मथुरा येथून इलेक्ट्रॉनिक कम्युनिकेशनमध्ये बी.टेक शिक्षण पूर्ण केले. पदवी शिक्षण पूर्ण केल्यानंतर काजलने विप्रोमध्ये नोकरी सुरू केली. ती ९ तास नोकरी करत असताना देखील तिने स्पर्धा परीक्षेची तयारी केली. ती नोकरीबरोबरच स्पर्धा परीक्षेत देखील यशस्वीरीत्या उत्तीर्ण झाली. कारण तिचे संपूर्ण लक्ष तिच्या अभ्यासावर आणि नोकरीवर केंद्रित होते. तिच्या पतीने देखील तिला संपूर्ण पाठिंबा दिला. त्यामुळे ती कधी घरातील कामात गुंतली नाही तर अभ्यासात मात्र गुंतली.
ती रोज ऑफिसला जाताना कॅबमध्ये तीन तास अभ्यास करायची. तर सुट्टीत दिवसभर अभ्यास करायची आणि यूपीएससी परीक्षेचा प्रत्येक टप्पा पार करण्यासाठी वेगवेगळ्या ट्रिक्स अवलंबायची. चांगली नोकरी, २३ लाखांचे वार्षिक पॅकेज असे असूनही काही दिवस तिने नोकरी करत स्पर्धा परीक्षेची तयारी केली. कालांतराने नोकरी सोडून प्रशासकीय अधिकारी होण्यासाठी तयारी करण्याचा निर्णय घेतला. नोकरी करत असताना काही प्रयत्न केले पण अपयश आले पण ती खचली नाही. ती प्रयत्न करत राहिली.
खरंतर ती पाचव्या प्रयत्नात २०१८ मध्ये युपीएससी परीक्षा उत्तीर्ण केली आणि २८वी रँक मिळवली. सध्या, त्या मध्यप्रदेशमध्ये प्रशासकीय अधिकारी म्हणून कार्यरत आहेत.