⁠  ⁠

बॉडीबिल्डर ते आयआरएस अधिकारी; रवी कपूर यांचा युपीएससीचा प्रवास…

Chetan Patil
By Chetan Patil 2 Min Read
2 Min Read

UPSC IAS Success Story : आयुष्यात खेळाडूवृत्ती असणे हे खूप महत्त्वाचे आहे. तसेच याचा फायदा स्पर्धा परीक्षेची तयारी करताना देखील होत असतोच. कारण, यात प्राथमिक परीक्षा, मुख्य परीक्षा आणि मुलाखत या पायऱ्या पार करून पद मिळवायचे असते. तसा हा प्रवास सोप्पा नक्कीच नसतो. पण जिद्दीने अभ्यास केल्यास नक्कीच यश मिळते. याचे उत्तम उदाहरण म्हणजे आज बॉडीबिल्डर, पॉवरलिफ्टर आणि आयआरएस अधिकारी, रवी कपूर.

IRS अधिकारी रवी कपूर हे त्यांच्या संपूर्ण प्रवासात शैक्षणिक आणि वैयक्तिक दोन्ही आव्हानांना सामोरे गेले. लठ्ठपणा आणि शैक्षणिक अडचणींशी झुंज देत त्याने बॉडीबिल्डिंग आणि पॉवरलिफ्टिंगमध्ये यश मिळविले. आशियाई पॉवरलिफ्टिंग चॅम्पियनशिपमध्ये भारतासाठी पदके आणि विजेतेपदे जिंकली. २००८ मध्ये, त्याने मिस्टर दिल्ली ही पदवी मिळवली आणि २००९ मध्ये त्याने दिल्ली रग्बी क्लबकडून खेळायला सुरुवात केली.

याच दरम्यान त्यांना आपण देखील खेळासोबत स्पर्धा परीक्षेकडे वळायला हवे ही जाणीव झाली.कोणतीही पार्श्वभूमी नसतानाही त्यांनी यूपीएससी परीक्षेची तयारी सुरू केली. अभ्यासक्रम, प्रश्नपत्रिका आणि इतर सर्व गोष्टी समजून घेतल्या. तसेच स्वतः बद्दलचा न्यूनगंड मागे टाकून पहिल्याच प्रयत्नात स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण केली. आयआरएस अधिकारी म्हणून पहिली पोस्टिंग चेन्नई विमानतळावरील सीमाशुल्क विभागात झाली.

त्याच बरोबर, रवी यांची पॉवरलिफ्टिंगची आवड कायम राहिली. २०१७ च्या ग्लोबल पॉवरलिफ्टिंग चॅम्पियनशिपमध्ये त्याने विजय मिळवला. तसेच, त्यांनी यूपीएससी विद्यार्थ्यांसाठी त्यांच्या आवडीतून पुस्तके आणि ब्लॉग लिहिले आहेत. यामागे, युपीएससीची तयारी सर्वांसाठी सुलभ व्हावी ही त्यांची दृष्टी होती. तसेच त्यांनी अनेक UPSC इच्छुकांना विनामूल्य मार्गदर्शन देण्यास सुरुवात केली, ज्यात अनेक स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण झाल्या आहेत.

Share This Article