UPSC IAS Success Story आय.ए.एस अधिकारी होण्याचे स्वप्न घेऊन युपीएससी परीक्षेला अनेक जण बसतात. परंतू, त्यापैकी फक्त काहीच जण युपीएससीची परीक्षा उत्तीर्ण करण्यात यशस्वी होतात. रुक्मणी रियार यांनी पहिल्याच प्रयत्नात ही परीक्षा उत्तीर्ण केली आहे. वाचा त्यांच्या यशोगाथेबद्दल…
आयएएस अधिकारी रुक्मणी रियार त्यांच्या सुरुवातीच्या काळात फार हुशार विद्यार्थिनी नव्हत्या. इतकेच नाहीतर सहावीत नापास देखील झाल्या होत्ता. त्यांचे शालेय शिक्षण गुरुदासपुरम येथून झाले. यानंतर डलहौसी येथील सेक्रेड हार्ट स्कूलमध्ये काहीकाळ झाले. पुढे रुक्मणी रियार यांनी अमृतसरमधील गुरु नानक देव विद्यापीठातून सामाजिक शास्त्रात पदवी प्राप्त केली. तसेच मुंबईतील टाटा इन्स्टिट्यूटमधून सामाजिक शास्त्रात पदव्युत्तर शिक्षण घेतले.
टाटा इन्स्टिट्यूट, मुंबई मधून अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर, रुक्मणी रायर यांनी म्हैसूरमधील अशोकया आणि मुंबईतील अन्नपूर्णा महिला मंडळासारख्या स्वयंसेवी संस्थांमध्ये इंटर्नशिप केली. एनजीओमध्ये काम करत असताना रुक्मणी रायर यांना नागरी सेवेबद्दल अधिक आवड वाटू लागली आणि यूपीएससी परीक्षेत बसण्याचा निर्णय घेतला. आपण थेट व्यवस्थेत काम केले तर कित्येकांचे प्रश्न हाताळू शकू या उद्देशाने त्यांनी हा निर्णय घेतला. त्यांनी या तयारीच्या दरम्यान बरेच मासिके व पुस्तकांचे वाचन केले. तसेच शालेय पुस्तक वाचनाकडे अधिक भर दिला.विशेष म्हणजे युपीएससी परीक्षेसाठी कोणत्याही कोचिंगमध्ये प्रवेश घेतला नाही आणि स्व-अभ्यासावर भर दिला. यामुळेच, रुक्मणी रियार यांनी पहिल्याच प्रयत्नात युपीएससीची परीक्षा उत्तीर्ण करण्यात यश मिळविले आणि आय.ए.एस अधिकारी झाल्या.