⁠
Inspirational

वेळप्रसंगी कारखान्यात काम केले, प्लॅटफॉर्मवर झोपले पण अथक परिश्रमाने झाले IAS अधिकारी !

UPSC IAS Success Story : शिवगुरु आपल्या आई आणि बहिणीला रात्रंदिवस काम करताना पाहत असतं. म्हणूनच त्यांनी आपले शिक्षण सोडण्याचा निर्णय घेतला आणि कारखान्यात ऑपरेटर म्हणून काम करण्यास सुरुवात केली. कारखान्यातील कामगार आयएएस अधिकारी कसा झाला? वाचा शिवगुरु प्रभाकरन (Shivguru Prabhakaran) यांच्याबद्दल…

शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या शिवगुरूच्या कुटुंबातील प्रत्येक सदस्याला शेतात काम करावे लागले. शिवाय, त्याचे वडील मद्यपी होते. त्यामुळे, त्याची आई आणि बहीण दिवसा शेतात काम करायचे आणि रात्री टोपल्या बनवायचे. शिवगुरु आपल्या आई आणि बहिणीला रात्रंदिवस काम करताना पाहत असत आणि म्हणूनच त्यांनी आपले शिक्षण सोडण्याचा निर्णय घेतला आणि ऑपरेटर म्हणून काम करण्यास सुरुवात केली. सलग त्यांनी दोन वर्षे कारखान्यात ऑपरेटर म्हणून काम केले आणि थोडी शेती केली. जे काही पैसे जमवू शकले ते त्यांनी कुटुंबासाठी खर्च केले आणि काही शिक्षणासाठी वापरले.

शिवगुरू कारखान्यात कामाला लागले असले तरी ते त्यांचे स्वप्न विसरले नाहीत. आपल्या बहिणीच्या लग्नानंतर शिवगुरुने पुन्हा अभ्यास करण्यास सुरुवात केली आणि आपल्या भावाला शिक्षण घेण्यास मदत केली. २००८ मध्ये शिवगुरूने वेल्लोर येथील थंथाई पेरियार गव्हर्नमेंट इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमध्ये सिव्हिल इंजिनीअरिंगमध्ये प्रवेश घेतला. त्यानंतर त्यांनी आयआयटी मध्ये एम.टेक ही पदवी घेतली.‌

या सगळ्या काळात वेळप्रसंगी प्लॅटफॉर्मवर झोपावे लागले. पण स्पर्धा परीक्षेचा ध्यास कायम होता. उच्च शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांनी स्पर्धा परीक्षेमध्ये लक्ष केंद्रित केले. दिवसभर काम करायचे आणि रात्री उशिरापर्यंत अभ्यास करायचे. परीक्षेच्या काही शेवटच्या आठवड्यापूर्वी फक्त आणि फक्त अभ्यासावर लक्ष केंद्रित केले. या कष्टाचे फळ म्हणता येईल….त्यांची IAS पदावर निवड झाली. सध्या ते चेन्नई येथे कामकाज बघत आहेत.

Related Articles

Back to top button