---Advertisement---

जिद्दीला सलाम ; तब्बल ३५ वेळा विविध स्पर्धा परीक्षा दिल्यावर मिळवले IAS पद !

By Chetan Patil

Published On:

---Advertisement---

UPSC IAS Success Story : अपयश हे यशाच्या विरुद्ध नसून यशाचा एक आवश्यक घटक आहे. काही लोक एक-दोन परीक्षांमध्ये नापास झाल्यावर हार मानतात, पण हा हरियाणातील विजय वर्धन तब्बल ३५वेळा विविध स्पर्धा परीक्षा नापास झाला.सरकारी नोकरीच्या परीक्षेत वारंवार नापास होऊनही तो आपल्या स्वप्नावर ठाम राहिला.३५ वेगवेगळ्या चाचण्यांमध्ये अपयशी ठरल्यानंतर अखेरीस तो युपीएससी परीक्षेत १०४वे स्थान मिळवण्यात यशस्वी झाला.तो त्याच्या चुकांमधून शिकला आणि प्रत्येक धक्क्यानंतर कठोर परिश्रम करत राहिला.

वर्धनचा जन्म सिरसा, हरियाणा येथे झाला आणि ते तिथेच शाळेत गेले. शालेय शिक्षण घेतल्यानंतर त्यांनी हिसारमधून इलेक्ट्रॉनिक्स इंजिनीअरिंगमध्ये बी.टेक.अभियांत्रिकी पदवी प्राप्त केल्यानंतर विजय वर्धन दिल्लीला गेले.

त्याच्या तयारीदरम्यान त्याने अनेक परीक्षांचा प्रयत्न केला, त्यात प्रत्येकी नापास झाला, ज्यात CGL, SSC, UPPSC, आणि हरियाणा PCS यांचा समावेश आहे. त्यानंतर तो खचला नाही तर तो लढत राहिला. २०१८ मध्ये त्याच्या प्रयत्नांना अखेरीस फळ मिळाले. युपीएससी उत्तीर्ण झाल्यानंतर आणि १०४वा ऑल इंडिया रँक (AIR) प्राप्त झाला. त्यांना IPS म्हणून नियुक्त करण्यात आले. पण विजय वर्धन त्याच्या IPS नोकरीवर समाधानी नव्हते, म्हणून त्यांनी २०२१ मध्ये पुन्हा अर्ज केला आणि IAS होण्याचे स्वप्न पूर्ण झाले.

Join WhatsApp Group

Join Now

Join Telegram Channel

Join Now

Related Posts