---Advertisement---

अपार कष्टाचे चीज झाले आणि गावचा मुलगा झाला आयपीएस अधिकारी!

By Chetan Patil

Published On:

---Advertisement---

UPSC IPS Success Story ग्रामीण भागात वातावरणात राहून अधिकारी बनणे ही नक्कीच सोप्पी गोष्ट नाही पण शरण गोपीनाथ कांबळे यांनी करून दाखवले आहे.त्यांचे लहानपणापासून प्रथम वर्ग अधिकारी होण्याचे स्वप्न होते. त्याचबरोबर उच्च शिक्षण घेणे ही गरज आणि आवड देखील होती. त्यानुसार त्यांनी प्रत्येक पावलावर यश संपादन केले.

शरण हे सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातील तडवळे या छोट्या गावातील रहिवासी. त्यांचे पहिली ते पाचवी पर्यंतचे शिक्षण गावातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत झाले. त्यानंतरचे माध्यमिक शिक्षण यशवंतराव चव्हाण प्राशाला तडवळे येथे झाले. दहावी मध्ये ९५% गुण घेऊन प्रथम आले. बारावीत ९१% सह पुढे बारावी पर्यंतचे शिक्षण विद्या मंदिर कॉलेज वैराग येथे झाले आहे. इतक्यावरच थांबून चालणार नाही म्हणून त्यांनी इंजिनिअरिंगचे शिक्षण घेतले. त्यांनी पदवीचे शिक्षण वालचंद कॉलेज ऑफ इंजिनियरिंग सांगली मधून पूर्ण केले. तर उच्च पदवीचे शिक्षण बेंगळुरू येथील भारतीय विज्ञान संस्था मधून झाले आहे.

त्यानंतर त्यांनी युपीएससीची परीक्षा देण्याचा ध्यास घेतला. या परीक्षेसाठी परीक्षेचा अभ्यासक्रम आणि मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका यावर त्यांनी जास्त लक्ष दिले.यासाठी ते नियमितपणे विविध वर्तमान, मासिके व पुस्तके वाचून नोट्स काढत असतं. त्यामुळेच त्यांना इतकी कठीण परीक्षा पास होणे अवघड वाटले नाही. त्यांनी तशी मेहनतही घेतली.त्यांच्या आई-वडिलांनी मोलमजुरी करून त्यांना उच्च शिक्षण दिले. तर मोठ्या भावाने स्वप्न पूर्ण होण्यासाठी नेहमी मला पाठबळ दिले. परंतू परिस्थितीची जाणीव मनात असायची, हीच जाणीव बाळगून आणि प्रेरीत राहून अभ्यास केला. त्यामुळेच ५४२ रॅंकसह आयपीएस अधिकारी झाले

Join WhatsApp Group

Join Now

Join Telegram Channel

Join Now

Related Posts