⁠  ⁠

वडिलांची इच्छा केली पूर्ण ; पूर्वी नंदा बनली IRS अधिकारी!

Chetan Patil
By Chetan Patil 1 Min Read
1 Min Read

UPSC IRS Success Story युपीएससीची परीक्षा म्हटलं की सातत्याने अभ्यास आणि चिकाटी ही हवीच. यात काहीजण उत्तीर्ण होतात तर काहींना अपयश येते. पण पूर्वी नंदा, आयआरएस अधिकारी, स्व-अभ्यासातून युपीएससीची परीक्षा उत्तीर्ण झालेल्या प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व आहेत.

पूर्वी ही मूळची उदयपूरची रहिवासी आहे. तिने गावी सेंट मेरी स्कूलमध्ये शालेय शिक्षण घेतले. तिने २०१९ मध्ये नॅशनल लॉ युनिव्हर्सिटीमधून एलएलबी पदवी मिळवली. पण तिच्या वडिलांची पितांबर नंदा यांची आयएएस अधिकारी बनण्याची इच्छा असल्याने तिला ही परीक्षा देण्यासाठी वेळोवेळी प्रोत्साहन केले. त्यामुळे तिने तिचा यूपीएससीकडे प्रवास सुरू झाला.

तिने ह्या प्रवासात मागील वर्षांच्या परीक्षेच्या प्रश्नपत्रिकेचा विशेषतः अभ्यास केला. जे परीक्षेचे स्वरूप समजून घेण्याचा आणि ज्ञानाचा आधार वाढवण्याचा प्रयत्न केला. या काळात तिने कोणत्याही सोशल मीडियाचा व फोनचा वापर केला नाही. फक्त अभ्यासावर एकाग्रता केली. ती दररोज दहा ते अकरा तास अभ्यास करत असतं. यामुळेच, जेव्हा पुर्वीला आयआरएस कॅडरचे स्थान मिळाले. त्यानंतर आयकर विभागात नोकरी मिळाली. तिच्या कारकिर्दीतील कामगिरी व्यतिरिक्त, पुर्वीने पुस्तके लिहिली आहेत.तिने बाहेरील कोचिंगच्या मदतीशिवाय परीक्षा उत्तीर्ण होण्याच्या अनुभवाचे वर्णन तिच्या “बिहाइंड द सीन: द अनटोल्ड स्टोरीज ऑफ युपीएससी अ‍ॅस्पिरंट्स” या पुस्तकात केले आहे. तिचा हा प्रवास प्रेरणादायी तर आहेच पण दिशादर्शक देखील आहे.

Share This Article