⁠  ⁠

एकदा नाहीतर दोनदा युपीएससीची परीक्षा उत्तीर्ण; वाचा IAS दिव्या मित्तल यांच्या यशाचा मंत्र!

Chetan Patil
By Chetan Patil 2 Min Read
2 Min Read

UPSC Success Story कोणतीही परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी आपल्याला मेहनत ही घ्यावीच लागते. तसेच दिव्या मित्तल यांनी देखील अहोरात्र मेहनत करून युपीएससीची परीक्षा उत्तीर्ण केली आहे. आपली शैक्षणिक वाटचाल व स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्यांनी आधीपासूनच ध्यास घेतला होता. आयआयटी, आयआयएम आणि यूपीएससी परीक्षांच्या तयारीला अधिक प्राधान्य दिले. तसेच एकाग्रता वाढविण्यासाठी विद्यार्थ्यांना ध्यानधारणा देखील केली. त्यामुळे त्या आधी आयपीएस मग IAS अधिकारी झाल्या.‌ सध्या IAS अधिकारी म्हणून कार्यरत आहेत.

दिव्या ह्या मूळच्या रेवाडी, हरियाणाची आहे. त्यांनी प्रतिष्ठित अशा आयआयटी दिल्लीतून अभियांत्रिकीची पदवी मिळवली. त्यानंतर त्यांनी आयआयएम बंगलोरमधून एमबीए केले. तिने लंडनमध्ये काम केले आणि Thnx पती गगनदीपसोबत भारतात परतल्या.

या सगळ्या दरम्यान त्यांनी स्पर्धा परीक्षेची तयारी सुरू ठेवली. स्पर्धा परीक्षेच्या या तयारी दरम्यान त्या सकाळी लवकर उठून अभ्यास करायच्या.अभ्यासादरम्यान ९० मिनिट/ २ तास लक्ष केंद्रित करण्यासाठी सत्र ठरवायच्या. प्रत्येक सत्रानंतर १५ मिनिटांचा ब्रेक करून नियोजन करायच्या.एकावेळी तुम्ही जास्त काळ लक्ष केंद्रित करू शकत नाही. त्यामुळे प्रत्येक सेशनसाठी जोपर्यंत अलार्म वाजत नाही तोपर्यंत अभ्यास केला‌.‌या सगळ्यात त्या मोबाईल व सोशल मिडीयापासून दूर राहिल्या. त्यामुळेच त्या पहिल्याच प्रयत्नात यूपीएससी उत्तीर्ण झाल्या. त्या आयपीएस झाल्या. त्यानंतर, त्यांच्या दुसऱ्या प्रयत्नात, त्यांनी २०१२ मध्ये UPSC CSE मध्ये ६८ वी रँक मिळवली आणि शेवटी त्या IAS अधिकारी झाल्या. त्यांचे पती गगनदीप सिंग यांनीही UPSC उत्तीर्ण केली असून ते भारत सरकारच्या सेवेत कानपूर येथे IAS म्हणून कार्यरत आहेत.

Share This Article