10वी-12वी अपयश; मात्र यूपीएससी परीक्षेत पाहिल्यात प्रयत्नात मिळविले यश
UPSC Success Story यूपीएससी सारख्या अवघड मानल्या जाणाऱ्या स्पर्धा परीक्षेत यश मिळवणे हे अनेक तरुण-तरुणींचे स्वप्न असते. परंतु त्यासाठी मेहनत घेण्याची देखील जिद्द असणे आवश्यक असते. सगळेच यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण होऊन यशस्वी होतात असे नाही त्यात अनेकांना अपयश ही येते. जिद्द आणि मेहनतीच्या जोरावर अनेक तरुण यामध्ये यशही प्राप्त करतात असेच एक उदाहरण म्हणजे आयएएस अंजू शर्मा.
दहावी व बारावी प्रत्येकासाठी अत्यंत महत्त्वाची असते कारण येथूनच पुढील करिअरच्या प्रवासाला सुरुवात होत असते परंतु दहावी आणि बारावीच्या परीक्षेमध्ये अंजू शर्मा यांना अपयश आले होते परंतु अशा परिस्थितीतही त्या ठामपणे उभ्या होत्या अंजू शर्मा यांना बारावीत देखील अर्थशास्त्र या विषयात त्या नापास झाल्या होत्या तसेच दहावीच्या प्री बोर्ड परीक्षेत देखील त्या अपयशी ठरल्या होत्या परंतु अंजू शर्मा यांना इतर विषयांमध्ये चांगले गुण मिळाले होते.
या अपयशानंतरही त्यांच्या आई चे पाठबळ त्यांच्यासोबत होते. अंजुला आईने प्रत्येक पावलावर साथ दिली व या प्रेरणेनेच त्यांनी कॉलेजमध्ये जाण्याच्या आधीच स्पर्धा परीक्षेची तयारी सुरू केली होती. यांनी जयपूर येथील कॉलेजमध्ये बीएससी ची पदवी प्राप्त केली. कॉलेजमध्ये असताना त्यांनी गोल्ड मेडलही मिळवले होते. त्यानंतर त्यांनी एमबीए पूर्ण केले व त्या नंतर यूपीएससीची परीक्षा पास केली.
अंजू शर्मा या यूपीएससीच्या पहिल्याच प्रयत्नात उत्तीर्ण झाल्या व राजकोट येथे सहाय्य कलेक्टर म्हणून कार्यरत होत्या.