संसाराचा गाडा ओढत पल्लवीने मिळवले UPSC परीक्षेत मोठे यश!

Published On: ऑक्टोबर 11, 2024
Follow Us

UPSC Success Story : लग्नानंतर सासरची जबाबदारी अंगावर आल्यानंतर मुलींना शिक्षण करणे अवघड होत असते, असे म्हटले जाते. परंतु जर आपली आवड असली आणि इच्छा असली तर सर्व काही शक्य होते. हे पल्लवी गुट्टे यांची करून दाखवले आहे.वाहतूक शाखेतील पोलीस निरीक्षक साहेबराव गु्ट्टे यांच्या सूनबाई आहेत. तर सेवा निवृत्त झालेले पोलीस उप-अधीक्षक संग्राम सांगळे यांची मुलगी.

पल्लवी ही उच्चशिक्षित असून लग्नानंतर ही तिने परीक्षेची तयारी सोडली नाही. या स्पर्धा परीक्षेच्या अभ्यासात पल्लवी यांना पती स्वरूप यांची देखील मोलाची साथ मिळाली. स्वरूप हे देखील उच्चशिक्षित असून इन्फोसिस कंपनीमध्ये कार्यरत आहेत. पल्लवी यांनी या पूर्वीदेखील त्यांनी युपीएससीची परीक्षा दिली होती. मुलाखतीपर्यंत त्यांनी मजल मारली होती. मात्र त्यात तिला यश मिळाले नाही. तरी ही त्यांनी खचून न जाता आपले प्रयत्न सुरूच ठेवले.

केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत पल्लवी यांनी ४५२ वा रँक मिळवला आहे. मूळात, पल्लवीने संसाराचा गाडा यशस्वीपणे सांभाळत युपीएससीत यश मिळवले आहे. दुसऱ्या प्रयत्नात पल्लवीने २०२२ च्या लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत यश गाठले. काही दिवसापूर्वी केंद्रीय लोकसेवा आयोगाचा 2022 परीक्षेचा अंतिम निकाल जाहीर झाला. या परीक्षेत अशा विद्यार्थ्यांनी यश मिळवले आहे, ज्याच्या पाठीमागे जबाबदारीचा गाडा असतानाही त्यांनी मोठी मेहनत घेऊन या परीक्षेत घवघवीत यश मिळवले आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Related Posts

वाह रे पठ्ठया! पहिल्याच प्रयत्नात पुण्याचा २२ वर्षीय तरुण झाला आयएएस

एप्रिल 23, 2025

यवतमाळच्या रिक्षाचालकाच्या लेकीने केली UPSC क्रॅक ; आता होणार जिल्हाधिकारी

एप्रिल 23, 2025
police

कोणतेही क्लासेस न लावता मारली MPSC परीक्षेत बाजी ; बनला पोलीस उपनिरीक्षक

एप्रिल 14, 2025

IAS होण्यासाठी तीन वेळा यूपीएससी क्रॅक केली ; चारू यांचा प्रेरणादायी प्रवास वाचा..

एप्रिल 1, 2025

डॉक्टर झाल्यानंतर UPSC परीक्षा देण्याचा निर्णय ; तिसऱ्या प्रयत्नात मिळविले यश, वाचा IFS अपाला मिश्रांचा प्रेरणादायी प्रवास

मार्च 19, 2025

राहण्यासाठी घर नाही, दोन वेळच्या जेवणाचेही पैसे नव्हते ; पठ्ठ्याने जिद्दीने UPSC क्रॅक केली अन् बनला IAS

मार्च 17, 2025