---Advertisement---

अवघ्या 22 व्या वर्षी UPSC परीक्षा क्रॅक; पहिल्याच प्रयत्नात बनल्या IAS ऑफिसर

By Chetan Patil

Published On:

---Advertisement---

UPSC Success Story : राजस्थानच्या (Rajasthan) सवाई मधुपूर जिल्ह्यातील आदलवाडा गावातील सुलोचना मीना (Sulochana Meena) यांनी UPSC परीक्षा पास करून एक अद्वितीय यश संपादन केले आहे. त्या अवघ्या २२ वर्षांच्या वयात ही परीक्षा पहिल्याच प्रयत्नात पास करणार्या सर्वात तरुण IAS ऑफिसरपैकी एक आहेत.

सुलोचना मीना यांनी २०२१ मध्ये यूपीएससी परीक्षा दिली होती ज्यात त्यांना ४१५वी रँक मिळाली. त्या आपल्या जिल्ह्यातील पहिल्या महिला आयएएस ऑफिसर आहेत. सुलोचना यांनी बारावीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर दिल्लीला जाऊन दिल्ली युनिव्हर्सिटीमधून ग्रॅज्युएशन पूर्ण केले. त्यानंतर त्यांनी यूपीएससी परीक्षेची तयारी सुरू केली.

---Advertisement---

सुलोचना मीना यांनी सेल्फ स्टडी करून यूपीएससी परीक्षा क्रॅक केली. त्या रोज वर्तमानपत्र वाचायच्या, युट्यूब, टेलिग्राम या अॅपवरून अनेक माहिती मिळवायच्या. वेगवेगळी पुस्तके वाचण्यासोबतच टेस्ट सीरीजवर लक्ष दिले. त्यांनी मॉक टेस्ट दिले आणि रोज ८ ते ९ तास अभ्यास करायचा. ही मेहनत आणि निरंतर प्रयत्नांमुळे त्यांना हे यश मिळाले.

सुलोचना मीना यांच्या यशाने अनेक तरुणांना प्रेरणा दिली आहे. त्यांच्या प्रवासातून असे स्पष्ट होते की मेहनत आणि दृढ निश्चयाशिवाय यश संपादन करणे शक्य नाही. सुलोचना मीना यांची कहानी आयुष्यात यशस्वी होण्यासाठी किती मेहनत आणि समर्पण आवश्यक आहे हे सांगते.

Join WhatsApp Group

Join Now

Join Telegram Channel

Join Now

Related Posts