---Advertisement---

एक-दोन नव्हे तब्बल ३५ वेळा अपयश आले ; शेवटी आयएएस अधिकारी बनले

By Chetan Patil

Published On:

---Advertisement---

UPSC Success Story : अपयश हीच यशाची पहिली पायरी असते. वारंवार अपयशी होण्यापासून ते स्वप्न साकार करण्यापर्यंतचा त्यांचा प्रवास खरोखरच प्रत्येकासाठी प्रेरणादायी ठरतो आहे. विजय वर्धन यांचा जन्म हरियाणातील सिरसा येथे झाला. त्यांनी हिसार येथून इलेक्ट्रॉनिक्स इंजिनियरिंगचे शिक्षण पूर्ण केले.पदवी शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्याने स्पर्धा परीक्षेच्या अभ्यासाला सुरुवात केली. तेव्हा त्याने विविध सरकारी नोकरीसाठीच्या परीक्षा दिल्या.

एक-दोन नव्हे, तर जवळजवळ ३५ वेळा सरकारी नोकरीसाठी परीक्षेला बसला. पण एकही परीक्षा पास होऊ शकला नाही. आपले कुठे चुकतंय? काय करायला हवे? यावर त्याने अभ्यास केला. आपले अपयश स्वीकारून, त्यापासून पुढे जाण्यावर भर दिला आणि निष्ठा व प्रामाणिकपणे काम करीत निकराने परिस्थितीशी लढत राहिला.नंतर त्याने यूपीएससी परीक्षेची तयारी करण्यासाठी दिल्ली गाठले‌. २०१८ मध्ये यूपीएससी परीक्षेत विजय वर्धन यांनी १०४ वा क्रमांक पटकावल्यामुळे त्यांची आयपीएस अधिकारी म्हणून निवड झाली.

पण, त्यांचे स्वप्न आयएएस अधिकारी बनण्याचे असल्याने ते समाधानी नव्हते. त्याने खचून न जाता स्वतःवर विश्वास ठेवला. विजय वर्धन यांनी २०१८ आणि २०२१ अशी दोन वेळा यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण केली आहे. त्यांनी २०२१ मध्ये यूपीएससी परीक्षा दिली आणि ७० वा क्रमांक मिळवून आयएएस अधिकारी होण्याचे स्वप्न यशस्वीरीत्या पूर्ण केले.

Join WhatsApp Group

Join Now

Join Telegram Channel

Join Now

Related Posts