UPSC Success Story : आपली मुलं शिकून मोठी व्हावी यासाठी आई – वडिलांनी भरपूर कष्ट घेतले. मुलाने पण जाणीव ठेवून करून दाखवले. ही गोष्ट आयआरएस अधिकार विष्णू औटी यांची आहे. विष्णू औटी यांचे बाबा तीन मुलांना पोटापाण्यासाठी दिवस-रात्र काम करायचे.त्यांची आई पिठात भरपूर पाणी मिसळायची आणि पोळ्या करायची.
त्यांच्या गावात शाळा पण नव्हती.त्यामुळे शाळेसाठी शेजारच्या गावात चार किलोमीटर दूर जावे लागत असे. तरीही त्यांनी शिक्षण सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला.मूळात गाव दुष्काळग्रस्त असल्याने एकही माध्यमिक शाळा नव्हती. वर्षानुवर्षे कोरड्या गावात पाण्याच्या कमतरतेमुळे पिके नष्ट व्हायची. पीक नाही म्हणजे काम नाही, त्यामुळे कुटुंबाची समस्या आणखी वाढली. तरी त्यांना शिकण्यासाठी घरच्यांनी खूप पाठिंबा दिला.
२०१० मध्ये विष्णू यांनी पहिल्याच प्रयत्नात राज्य सेवा परीक्षा उत्तीर्ण केली आणि जळगावमध्ये विक्री विभागातील कर आयुक्त म्हणून त्यांना त्यांची पहिली पोस्टिंग मिळाली. पुढे त्यांनी हा ध्यास चालूच ठेवला. नोकरी करत असताना युपीएससी परीक्षा देण्याचे ठरवले.ते लंच ब्रेकमध्ये, रात्री, पहाटेदेखील ते अभ्यास करत असत. २०१६ मध्ये त्यांनी तिसऱ्या प्रयत्नात १०६४ रँकसह परीक्षा उत्तीर्ण केली. यातून त्यांची आयआरएस अधिकारी पदी निवड झाली.