वाचा नेहा जैनचा डेंटिस्ट डॉक्टर ते आयएएस अधिकारीपर्यंतचा प्रवास
IAS Success Story आयुष्यात काही स्वप्ने पूर्ण करण्यासाठी बरेच टप्पे पार करावे लागतात. तसेच नेहा जैन यांच्या करिअरचे पण दोन टप्पे आहेत. डेंटिस्ट असलेल्या तरुणीने डॉ. नेहा जैन हिने यूपीएससी उत्तीर्ण केली असून ती आता आयएएस अधिकारी झाली आहे.
नेहाचा जन्म दिल्लीत झाला. तिचे आई-वडील पीके जैन आणि मंजुलता जैन एका विमा कंपनीत काम करतात. तर त्याचा धाकटा भाऊ डॉक्टर आहे. नेहाला लहानपणापासूनच अभ्यासाची आवड होती. तिने शालेय शिक्षण पूर्ण झाल्यावर बारावीनंतर बीडीएस केल्यानंतर डेंटिस्ट झाली. त्यांनी मौलाना आझाद इन्स्टिट्यूट ऑफ डेंटल सायन्सेसमधून बीडीएस पदवी प्राप्त केली. यानंतर डेंटल कंसल्टेंट म्हणून काम सुरू केले.
आपण पण व्यवस्थेत राहून काम करावे, काहीतरी बदल घडवून आणावा ही तिची इच्छा होती. त्यासाठी तिने स्पर्धा परीक्षेची तयारी सुरू केली आणि आयएएस होण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी तिने कोचिंग क्लासेस पण लावला. ती रोज वर्तमानपत्र वाचायची तसेच दररोज वर्तमानपत्रातील संपादकीय वाचत असे. वर्तमानपत्रे वाचून चालू घडामोडीही अपडेट होत होत्या.आणि किमान चार ते पाच तास तरी अभ्यास करायची. यामुळे तिचे लेखन कौशल्य सुधारले आणि मुख्य तयारीसाठी उत्तर लिहिण्याचा भरपूर सराव झाला. यामुळेच तिला युपीएससी २०१७ मध्ये ऑल इंडिया चौदाव्या रँकसह आय. ए. एस हे पद मिळाले.