---Advertisement---

डॉक्टर ते प्रशासकीय अधिकारी! वाचा रेणू राजचा धाडसी प्रवास..

By Chetan Patil

Published On:

---Advertisement---

UPSC Success Story : सामान्य लोकांसाठी काहीतरी करायचे आहे आणि त्यांचे जीवन चांगले बनवायचे आहे. याच स्वप्नासाठी तिने आयएएस अधिकारी बनण्याचा निर्णय घेतला. आयएएस अधिकारी रेणू राज हा प्रवास..त्या केरळमधील कोट्टायम येथील रहिवासी आहे. रेणू राजने त्यांच्या पहिल्याच प्रयत्नात युपीएससी परीक्षा उत्तीर्ण करण्यात यश मिळविले आणि २०१४ मध्ये तिने या परीक्षेत दुसरा क्रमांक मिळवला.

रेणू राज या मुन्नारच्या हिल स्टेशनमध्ये बेकायदा बांधकामे आणि जमिनीवरील अतिक्रमणांवर कठोर कारवाई करण्यासाठी अग्रेसर असणाऱ्या, कायदा सांभाळत काम करणाऱ्या अधिकारी ओळखल्या जातात.

रेणू राज यांनी केरळमधील कोट्टायम येथील सेंट तेरेसा उच्च माध्यमिक विद्यालयातून शालेय शिक्षण पूर्ण केले आहे. त्यानंतर त्यांनी कोट्टायम येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून वैद्यकशास्त्राचे शिक्षण घेतले.रेणू राजचे वडील निवृत्त सरकारी कर्मचारी आहेत आणि तिची आई गृहिणी आहे. रेणूला दोन बहिणी असून दोघीही व्यवसायाने डॉक्टर आहेत.

रेणू राज यांनी एकदा एका मुलाखतीत सांगितले होते की, आयएएस अधिकारी होण्याचे त्यांचे लहानपणापासूनचे स्वप्न होते. त्या सर्जन म्हणून काम करत असताना, त्यांना वाटले की, एक डॉक्टर असल्याने ५० किंवा १०० रुग्णांना मदत करू शकले असले, परंतू नागरी सेवा अधिकारी म्हणून एका निर्णयाचा हजारो लोकांना फायदा होईल. सामान्य माणसाची गरज लक्षात घेऊन डॉक्टर पद सोडून सरकारी अधिकारी बनण्याचा रेणू यांचा निर्णय नक्कीच धाडसी आहे.सध्या त्या अलाप्पुझा येथे आयएएस अधिकारी म्हणून काम बघत आहेत.

Join WhatsApp Group

Join Now

Join Telegram Channel

Join Now

Related Posts