---Advertisement---

वाह रे पठ्ठया! पहिल्याच प्रयत्नात पुण्याचा २२ वर्षीय तरुण झाला आयएएस

By Chetan Patil

Published On:

---Advertisement---

UPSC Success Story : केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणाऱ्या युपीएससी (UPSC) परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला असून यात पुण्याच्या पानशेतजवळील रुळे गावचा शिवांश जगडे हा २२ वर्षीय तरुण पहिल्याच प्रयत्नात आयएएस झाला.

शिवांश जगडे याने पहिल्याच प्रयत्नात यूपीएससी परीक्षा क्रॅक केली आहे. विशेष म्हणजे त्याचे वडील शेतकरी असून, आई शिवणकाम करते. त्याची माेठी बहीण वकील आहे. अतिशय सामान्य कुटुंबातून आलेला शिवांश स्वकष्टातून यशाला गवसणी घालत देशात २६ वे स्थान पटकावले आहे.या यशाबद्दल सांगताना शिवांश म्हणताे, लहानपणापासूनच काही तरी चांगलं करण्याची जिद्द मनात हाेती. त्यानुसार मी अभ्यासावर लक्ष केंद्रित केले हाेते. डीएसके स्कूल येथून दहावी केली. एसपीआय औरंगाबाद येथून बारावी उत्तीर्ण झालाे.

---Advertisement---

मी सुरुवातीला ‘एनडीए’च्या परीक्षेची तयारी केली, पण त्यात यश आले नाही. मला पहिल्यापासून समाजसेवेची आवड हाेती. त्यामुळे नाेकरी करायची तर, अशी ज्यातून मला समाजाला न्याय देता येईल. त्यांचे हक्क त्यांना मिळून देता येईल. यादृष्टीने विचार करताना मला एकच मार्ग दिसला ताे म्हणजे स्पर्धा परीक्षेचा. त्यानुसार स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करू लागलाे.

घरची परिस्थिती जेमतेम असल्यामुळे क्लासेसशिवाय अभ्यास करण्याचा निश्चय केला आणि नियाेजनबद्ध अभ्यास करून परीक्षेला सामाेरे गेलाे.जिद्द आणि कष्ट करण्याची तयारी असेल तर यश निश्चित मिळते, हे मला या यशातून कळाले आहे. त्यामुळे मी इतर स्पर्धा परीक्षा करणाऱ्या मित्रांना एकच सांगेन की, नियाेजनबद्ध तयारी करा, यश हमखास मिळेल, अशी भावना शिवांग जगडे यांनी व्यक्त केली.

Join WhatsApp Group

Join Now

Join Telegram Channel

Join Now

Related Posts