UPSC Success Story : स्वतःच्या क्षमतेवर विश्वास असेल तर यश नक्कीच मिळते. त्यासाठी कोणत्याही महागडे क्लासेसची आणि सुखसोयीची आवश्यकता नसते हे श्रध्दाने दाखवून दिले. तिने घरीच अभ्यास करून पहिल्या झटक्यात UPSC मध्ये चमकदार कामगिरी केली आहे.
श्रध्दा ही बीड जिल्ह्यातील लोणी शहाजानपुर येथील सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील कन्या. तिचे वडील देखील शेतकरी तर ऊसतोड कामगार देखील…लहानपणापासून श्रद्धाची शिकायची जिद्द होत. तिच्या घरच्यांनी देखील तिला शिक्षणासाठी पाठिंबा दिला.
त्यामुळे, ती भारतीय अभियांत्रिकी सेवा परीक्षा आईएस परीक्षेत महाराष्ट्र राज्यातून प्रथम तर देशांतून ३६ वी आलेली आहे. तिचे शालेय शिक्षण देखील लोणी येथे झाले. तर माध्यमिक शिक्षण बीड येथे तर अभियांत्रिकी शिक्षण हे औरंगाबाद येथे झाले आहे. शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयातून तिने इलेक्ट्रिक इंजिनिअरिंगचे शिक्षण पूर्ण केले आहे.औरंगाबादच्या शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाने तिला सॉफ्टवेअर इंजिनीअर पदावर नोकरीची ऑफर केली. मात्र, तिला भारतीय अभियांत्रिकी सेवेत जायचे होते.
त्यामुळे तिने नम्रपणे नकार देत युपीएससीची तयारी केली.पदवी मिळताच अवघे सहा महीने तिने यूपीएससीचे क्लासेस केले. यूपीएसीमध्ये पहिल्या प्रयत्नांमध्ये हे यश मिळवले.युपीएससीतून आयएएस, आयआरएस, आयपीएस सेवेत जाणाऱ्यांची जिल्ह्यातील उमेदवारांची संख्या मोठी आहे. मात्र, मुलींमधून भारतीय अभियांत्रिकी सेवेत जाणारी श्रद्धा जिल्ह्यातील पहिलीच आहे.