UPSC Success Story लहानपणापासून आपल्या वडिलांचा आदर्श घेत शुभमने अभ्यास केला. शुभम हा मूळचा शिरूर तालुक्यातील केंदूर-पाबळ गावचा लेक. शुभमचे वडील भगवान हे पुणे शहर पोलीस दलात कार्यरत होते. १९९३ पासून वाकड – कावेरीनगर पोलीस लाईनमध्ये थिटे कुटूंब वास्तव्यास आहेत. शुभम याने अभियांत्रिकी अभियंता पदापर्यंत शिक्षण घेतले.
आकुर्डीतील पिंपरी-चिंचवड पॉलिटेक्निकल कॉलेजमधून अभियांत्रिकीची पदवी घेतली असली तरी शुभमचे ध्येय वेगळे होते. भारतीय प्रशासकीय सेवेत जाण्याचे स्वप्न त्याने उराशी बाळगले. त्यादृष्टीने तो गेल्या सहा वर्षापासून युपीएससी परिक्षेचा अभ्यास करीत होता. मध्ये दोन वर्षे करोना प्रादूर्भावामुळे परिक्षा झाली नाही. युपीएससीच्या चार परिक्षांमध्ये त्याला अपयश आले. मात्र, अपयशाने खचून न जाता शुभमने पाचव्यांदा युपीएससी परिक्षेची तयारी सुरू केली. या मेहनतीला फळ मिळाले.
भगवान थिटे यांनी आपल्या दोन्ही मुलांच्या शिक्षणाकडे प्राधान्याने लक्ष देत त्यांना उच्चशिक्षण दिले. त्यांची मोठी मुलगी स्नेहल ही संगणक अभियंता असून हिंजवडी आयटी पार्कमध्ये इन्फोसिस कंपनीत नोकरीला आहे. तर, मुलगारात्रं-दिवस जोमाने अभ्यास करीत त्याने परिक्षा दिली.या परीक्षेत यश मिळवले.पिंपरी-चिंचवड पोलिस दलात कार्यरत असणाऱ्या सहाय्यक पोलिस फौजदाराच्या मुलाने केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (युपीएससी) परिक्षेत यशाला गवसणी घातली आहे. त्याने या परिक्षेत ३५९ वा रँक प्राप्त केला आहे.