हिंमत हरली नाही; अभ्यासाच्या जोरावर झाली IAS, वाचा सौम्याच्या यशाची यशोगाथा..
UPSC Success Story : IAS अधिकारी होण्यासाठी विद्यार्थी खूप कष्ट करतात पण काही विद्यार्थांना अजूनही स्वतःवर विश्वास नसतो की आपण स्पर्धा परीक्षा यशस्वीपणे पास करू शकतो. अशा परिस्थितीत जेव्हा यश मिळते आणि ती स्वप्नपूर्ती पूर्ण होते. तो प्रत्येकाच्या आयुष्यातील कलाटणी देणारा क्षण असतो. अशीच सौम्याच्या यशाची यशोगाथा वाचा….
सौम्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. ज्यामध्ये ती सांगत आहे की, जेव्हा यूपीएससीचा अंतिम निकाल आला. तिने UPSC सर्व्हिसेस परीक्षेच्या निकालाची PDF फाईल डाऊनलोड केली होती. पण तिची नाव पाहण्याची हिंमत होऊ शकली नाही. म्हणूनच तिची आई म्हणालीत की, खालून नाव बघायला सुरुवात कर. तिने नाव यादीत लास्टपासून बघायला सुरुवात केली बराच वेळ नाव दिसले नाही तेव्हा ती हतबल झाली. पण जेव्हा तिने वरून यादी तपासली तेव्हा तिच्या आनंदाला पारावार उरला नाही. तिने यूपीएससी सिव्हिल सर्व्हिसेस परीक्षा फक्त उत्तीर्ण केली नाहीतर, तर त्यात टॉपही केले. नागरी सेवा परीक्षेत चौथा क्रमांक मिळाला होता.
IAS सौम्या पांडे २०१६ च्या बॅचची विद्यार्थी आहे. तिने पहिल्याच प्रयत्नात यूपीएससी उत्तीर्ण केली. सौम्याच्या शैक्षणिक विक्रमाबद्दल बोलायचे झाले तर, तिला दहावी आणि बारावीत चांगल्या प्रकारे गुण मिळाले होते. याशिवाय, ती अभियांत्रिकी महाविद्यालयात सुवर्णपदक विजेती होती.
सध्या IAS सौम्या पांडे उत्तर प्रदेशमध्ये कार्यरत आहेत.
अभ्यासासोबतच सौम्याला खेळ आणि नृत्यासारख्या उपक्रमांमध्येही खूप रस आहे. तिने शास्त्रीय नृत्य देखील शिकले आहे आणि ती बास्केटबॉल खेळाडू देखील आहे. याशिवाय ती एनसीसी बी आणि सी प्रमाणपत्र धारक देखील आहे.