नाशिकच्या रिक्षाचालकाच्या लेकाने मिळवले UPSC परीक्षेत दुसऱ्यांदा यश !

Published On: सप्टेंबर 7, 2023
Follow Us

UPSC Success Story नाशिक येथे राहणारे रिक्षाचालक जगन्नाथ पवार यांचा मुलगा स्‍वप्‍नील याने अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत अभ्यास करत केंद्रीय लोकसेवा आयोगाच्‍या परीक्षेत यशस्वी झाला आहे. तो दिवसभर नोकरी करायचा आणि मिळेल त्‍या वेळेत अभ्यास करायचा, अशा सातत्यातून स्वप्नीलने पहिल्‍याच प्रयत्‍नात यूपीएससी परीक्षेत यश मिळविले.

अगदी शालेय जीवनापासून अभ्यासात हुशार असलेल्‍या स्‍वप्‍नीलने पेठे विद्यालयातून दहावीत 93 टक्‍के गुण मिळविले होते. स्वप्नील यांनी केटीएचएम महाविद्यालयातून बारावीची परीक्षा पास करत जेईई परीक्षेच्‍या माध्यमातून पुण्यातील विश्‍वकर्मा इन्‍स्‍टिट्यूट ऑफ टेक्‍नॉलॉजीमध्ये प्रवेश मिळविला. केमिकल इंजिनिअरिंग पूर्ण करताना प्‍लेसमेंटच्‍या माध्यमातून त्यांनी फॅब्‍स इंटरनॅशनलमध्ये प्रकल्‍प अभियंता म्‍हणून काम पाहिले. नंतर स्पर्धा परीक्षा देण्याचा प्रयत्न देखील केला मात्र रँक कमी आली, सर्व्हिस अपग्रेड करण्यासाठी त्यांनी पुन्हा एकदा परीक्षा देण्याचा ठाम निर्धार केला. मात्र नव्या यशामुळे स्वप्नीलचे आयपीएस होण्याचे स्वप्न साकार होणार आहे.

भरपूर शिकण्याच्‍या त्‍याच्‍या जिद्दीपुढे आर्थिक अडचणीसह अनेक गतिरोधक होते. परंतु, अडथळ्यांची ही शर्यत पार करत आईवडिलांच्या पाठबळावर स्‍वप्‍नीलने शिकण्याच्‍या ध्येयाकडे वाटचाल सुरू ठेवली.शाळेपासून यूपीएससी करण्याचे स्वप्न होते. मागील परीक्षेत देशात ६३२ वा क्रमांक मिळवून स्वप्नील पवार यांना इंडियन रेल्वेत पोस्टिंग मिळाली. पण रँक सुधारण्यासाठी स्वप्नील यांनी पुन्हा या अवघड परीक्षेला सामोरे जाण्याचा निर्धार केला. गुणवत्तेला कष्टाची जोड मिळाली आणि अखेर स्वप्नील यांनी यूपीएससीतील चांगल्या ४१८ रँकचे स्वप्न साकार झाले. मागील यूपीएससी परीक्षेतुन आयआरएससाठी निवड झालेली असतानाही रँक सुधारण्यासाठी मी पुन्हा एकदा परीक्षा दिली आणि यश मिळाले.

मित्रांनो, २४ तास अभ्यासात व्‍यस्‍त राहाण्यापेक्षा वेळेचे योग्‍य व्‍यवस्‍थापन करत कमी वेळ पण प्रभावी पद्धतीने उमेदवारांनी अभ्यास करावा. उपलब्‍ध संसाधनांचा योग्‍य वापर करता आला पाहिजे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Related Posts

वाह रे पठ्ठया! पहिल्याच प्रयत्नात पुण्याचा २२ वर्षीय तरुण झाला आयएएस

एप्रिल 23, 2025

यवतमाळच्या रिक्षाचालकाच्या लेकीने केली UPSC क्रॅक ; आता होणार जिल्हाधिकारी

एप्रिल 23, 2025
police

कोणतेही क्लासेस न लावता मारली MPSC परीक्षेत बाजी ; बनला पोलीस उपनिरीक्षक

एप्रिल 14, 2025

IAS होण्यासाठी तीन वेळा यूपीएससी क्रॅक केली ; चारू यांचा प्रेरणादायी प्रवास वाचा..

एप्रिल 1, 2025

डॉक्टर झाल्यानंतर UPSC परीक्षा देण्याचा निर्णय ; तिसऱ्या प्रयत्नात मिळविले यश, वाचा IFS अपाला मिश्रांचा प्रेरणादायी प्रवास

मार्च 19, 2025

राहण्यासाठी घर नाही, दोन वेळच्या जेवणाचेही पैसे नव्हते ; पठ्ठ्याने जिद्दीने UPSC क्रॅक केली अन् बनला IAS

मार्च 17, 2025