⁠  ⁠

जळगावची खान्देश कन्या वैष्णवी निघाली नासा अभ्यास दौऱ्याला…

Chetan Patil
By Chetan Patil 1 Min Read
1 Min Read

‘किर्ती लहान, मुर्ती महान’ या उक्तीप्रमाणे वैष्णवीची चिकित्सक अभ्यासाच्या जोरावर अल्बामा येथील यूएस स्पेस अँड रॉकेट सेंटर येथील प्रशिक्षण कार्यक्रमात निवड झाली आहे. वैष्णवीचे वडील फीटर काम व स्पेअरपार्टचे दुकान सांभाळून शेती करतात. आई गृहिणी आहे. वैष्णवी खोमणे विद्या प्रतिष्ठानच्या सुपे (ता. बारामती) येथील सुपे इंग्लिश माध्यमाच्या शाळेची विद्यार्थीनी आहे.

२६ ऑगस्ट २०२३ रोजी यूएस नॅशनल एरोनॉटिक्स अँड स्पेस ॲडमिनिस्ट्रेशनच्या (नासा) सहकार्यान अल्बामा येथील यूएस स्पेस अँड रॉकेट सेंटर येथे प्रशिक्षण कार्यक्रम निवडीसाठी परीक्षा घेण्यात आली होती. ही परीक्षा स्वान रिसर्च अँड सोशल स्टडी फाऊंडेशन आणि सेडोर इंटरनॅशनलद्वारे घेण्यात आली होती.

नासाच्या आठ दिवसांच्या अभ्यास दौऱ्यासाठी या परीक्षेतून महाराष्ट्र राज्यातील अकरा विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली आहे. या परीक्षेमध्ये विद्या प्रतिष्ठानच्या सुपे इंग्लिश मीडियम स्कूलची इयत्ता दहावीची विद्यार्थिनी वैष्णवी खोमणे हिने उत्तम यश मिळवत ११ विद्यार्थ्यांमध्ये स्थान मिळवले आहे. या परीक्षेत शालेय अभ्यासक्रमात समावेश असलेल्या गणित, विज्ञान, भूगोल आणि बुद्धीमापन या विषयाचा समावेश होता.तिची याच परीक्षेत निवड झाली. यामुळे तिला विद्यार्थीदशेतच अंतराळ संशोधन आणि प्रात्यक्षिके यांचा अभ्यास करायला मिळणार आहे.

Share This Article