---Advertisement---

विराट-अनुष्का यांचा विवाह

By Saurabh Puranik

Published On:

anushka-virat
---Advertisement---

भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा अखेर 11 डिसेंबरला विवाहबंधनात अडकले. इटलीच्या टस्कनी प्रांतातील बोर्गो फिनेशिटो रिसॉर्टमध्ये सोमवारी विराट-अनुष्का यांचा विवाहसोहळा पार पडला. सचिन-शाहरुखसह ५० लोकांनाच निमंत्रण होते. फक्त १०० लोकसंख्येच्या बिबिआनो गावातील हे रिसॉर्ट जगातील दुसरे सर्वात महागडे आहे. डिसेंबरमध्ये ते बंद असते. पण, या लग्नासाठी खास सुरू ठेवण्यात आले. २१ डिसेंबरला दिल्ली व २६ ला मुंबईत स्वागत समारंभ होईल. लग्नानंतर हे नवदाम्पत्य आता द.आफ्रिकेला रवाना होणार आहेत. येथे विराट त्याच्या आगामी सामन्यांची तयारी करेल. तर अनुष्का त्यावेळी त्याच्यासोबत नववर्षाचा आनंद साजरा करेल. यानंतर हे दोघे जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात भारतात परतणार आहेत. भारतात परतल्यानंतर अनुष्का आनंद एल रायच्या चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी सुरुवात करेल. त्याचसोबत ती ‘सुई-धागा’ चित्रपटासाठीही तयारी करेल. वरुण आणि अनुष्का फेब्रुवारीमध्ये चित्रीकरणाला सुरुवात करतील. अनुष्काचा ‘परी’ चित्रपट ९ फेब्रुवारीला प्रदर्शित होणार असल्याने त्याच्या प्रमोशनमध्येही अनुष्का बिझी होणार आहे.

Join WhatsApp Group

Join Now

Join Telegram Channel

Join Now