---Advertisement---

एमपीएससी सामान्य अध्ययन पेपर- १

By Dr. G. R. Patil

Updated On:

loksatta spardha pariksha guru
---Advertisement---

डॉ. जी. आर. पाटील

तयारी-
या पेपरमध्ये साधारणपणे खालील विषयांचा समावेश होतो.

१) महाराष्ट्र, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील महत्त्वाच्या घडामोडी

२) इतिहास (महाराष्ट्राच्या संदर्भासह) आणि भारतीय स्वातंत्र्य चळवळ

३) राज्य पद्धती व प्रशासन

४) आर्थिक आणि सामाजिक विकास

६) सामान्य विज्ञान

१) चालू घडामोडी : कोणत्याही स्पर्धा परीक्षेचा हा महत्त्वाचा गाभा आहे. स्पर्धा परीक्षेद्वारे निवड होणाऱ्या परीक्षार्थीना राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर काय घडामोडी होत आहे याचे ज्ञान आवश्यक आहे. चालू घडामोडींसाठी एक स्वतंत्र नोंदवही तयार करून रोजच्या रोज टिपण काढल्यास फायदा होतो. त्या वहीचे खालीलप्रमाणे भाग करून नियमित वृत्तपत्रातून (उदा. लोकसत्ता, इंडियन एक्स्प्रेस, योजना, कुरूक्षेत्र इ.) टिपणे काढावीत. चालू घडामोडीची तयारी रोज करावी.

२) इतिहास (महाराष्ट्राच्या संदर्भासह) व भारतीय स्वातंत्र्य चळवळ : या विषयाची व्याप्ती मोठी आहे. कारण इतिहास म्हटला तर त्याचे खालील भाग पडतात. १) प्राचीन भारताचा इतिहास २) मध्ययुगीन भारताचा इतिहास ३) आधुनिक भारताचा इतिहास ४) भारतीय स्वातंत्र्याची चळवळ. आधुनिक भारताचा इतिहास हा कोणत्याही परीक्षेला विचारला जाणारा महत्त्वाचा विभाग आहे.

संदर्भग्रंथ : बिपीन चंद्रा, बी. एन. ग्रोव्हर व एन.सी. ई.आर.टी.ची पुस्तके.

याशिवाय प्राचीन भारताचा इतिहास व मध्ययुगीन भारताच्या इतिहासासाठी महाराष्ट्राचा संदर्भ घेऊन अभ्यास करावा. जर इतिहासासाठी स्वतंत्र वही तयार करून त्यात संक्षिप्त स्वरूपात माहिती, सनावळय़ा इत्यादी लिहून ही वही परत परत वाचल्यास निश्चितच फायदा होतो.

३) महाराष्ट्र, भारत व जगाचा भूगोल : एम.पी.एस.सी.च्या सुरुवातीच्या अभ्यासक्रमात फक्त महाराष्ट्राचा व भारताचा भूगोल होता. मात्र बदललेल्या अभ्यासक्रमात जगाचा भूगोल नव्याने समाविष्ट करण्यात आला आहे. भूगोलावर काही प्रश्न आता विशेषत: नकाशावर विचारले जातात. याचा अभ्यास करण्यासाठी सर्वप्रथम परीक्षार्थीनी महाराष्ट्राचा व भारत आणि जग यांचा नकाशा घेणे आवश्यक आहे व नकाशा समोर ठेवून अभ्यास करावा.

संदर्भग्रंथ : महाराष्ट्र व भारताचा भूगोल तसेच एन.सी.ई.आर.टी.ची ५वी ते १०वी पर्यंतची पुस्तके वाचावीत.
जगाचा भूगोलाचा अभ्यास करताना सर्वप्रथम जगातील पर्वतरांगा, नदीप्रणाली, जगातील वाळवंटे यांची स्वतंत्र सूची तयार करावी व नंतर खंडाप्रमाणे अभ्यास सुरू करावा. जेणेकरून अभ्यास सेपा होईल. उदा. अमेरिका खंड- उत्तर अमेरिका-कॅनडा-दक्षिण अमेरिका इत्यादी. युरोप खंड, आफ्रिका खंड.

संदर्भग्रंथ : जिओग्रॉफी थ्रू मॅप्स- के. सिद्धार्थ यांचे पुस्तक आवश्य वाचावे.

४) पर्यावरण : हा अभ्यासासाठी सर्वात सोपा व मनोरंजक असा विभाग आहे. यासाठी विद्यार्थ्यांनी खालील प्रकरणांचा आधार घ्यावा. वातावरणातील बदल, जैवविविधता, पारिस्थितीकी, ग्लोबल वॉìमग, कार्बन क्रेडिट, बायोस्पेअर रिझव्‍‌र्ह, नॅशनल पार्क, ओझोन थराचा क्षय, बायोडायव्हर्सटिी हॉट स्पॉट त्याचप्रमाणे वातावरण बदलासंदर्भात घेण्यात आलेल्या विविध परिषदा. उदा. रिओ परिषद, कानकून परिषद इत्यादी.

५) भारतीय व महाराष्ट्रात राज्यपद्धती व प्रशासन : या घटकावर मुख्य परीक्षेसाठी स्वतंत्र पेपर असल्याने विद्यार्थ्यांनी या घटकाची तयारी चांगली करावी. तयारी करताना दैनंदिन घडामोडींचा संदर्भ घ्यावा. प्रथम भारतीय राज्यघटना व्यवस्थित वाचून ती समजून घ्यावी. निरनिराळय़ा घटना दुरुस्त्या, भारतीय राज्य प्रणाली, पंचायत राज, ७३ वी घटना दुरुस्ती, ७४ वी घटना दुरुस्ती, पंचायतराज व नागरी प्रशासन, मानवी हक्क, न्यायिक प्रणाली, निरनिराळे आयोग, त्यांचे कार्य, केंद्रीय व राज्यस्तरावर नियुक्त केलेल्या निरनिराळय़ा समित्या यांचा अभ्यास करावा.

संदर्भग्रंथ : के. लक्ष्मीकांत, सुभाष कश्यप, भा. ल. भोळे, घांगरेकर यांची पुस्तके.

६) आर्थिक व सामाजिक विकास : अभ्यासक्रमात भारतीय अर्थव्यवस्था याऐवजी आर्थिक व सामाजिक विकास हा शब्द वापरला आहे. त्यामुळे बऱ्याच विद्यार्थ्यांचा गोंधळ उडू शकतो. हा विभाग परीक्षेसाठी महत्त्वाचा आहे. अभ्यास करताना अर्थशास्त्राच्या काही संकल्पना समजावून घ्याव्यात. त्याचप्रमाणे जुन्या अभ्यासक्रमात असलेल्या पंचवार्षकि योजना, बँक प्रणाली, आयात-निर्यात धोरण, कर प्रणाली, विविध आंतरराष्ट्रीय संघटना, उदा. जागतिक व्यापार संघटना, जागतिक बँक, आंतरराष्ट्रीय नाणेनिधी, दारिद्रय़ निर्मूलन, रोजगार निर्मिती यांचादेखील अभ्यास करावा. शाश्वत विकास, लोकसंख्या, सामाजिक क्षेत्र, भारत व महाराष्ट्राची कृषी व्यवस्था व सहकार इ.

संदर्भ ग्रंथ : इंडिया इअर बुक, दत्त आणि सुंदरम् किंवा प्रतियोगिता दर्पणचा भारतीय अर्थव्यवस्था (विशेषांक) .

७) सामान्य विज्ञान : यामध्ये १) जीवशास्त्र, २) भौतिकशास्त्र, ३) रसायनशास्त्र व दैनंदिन जीवनात घडणाऱ्या विविध घटनांशी संबंधित असलेल्या सामान्य विज्ञानावर प्रश्न विचारले जातात. शास्त्रीय घटकांचा जास्त अभ्यास करू नये. उदा. रसायनशास्त्रातील निरनिराळय़ा अभिक्रिया, जीवशास्त्रातील प्राणिविज्ञान इत्यादी. मात्र जीवशास्त्राचा एक भाग म्हणजे शरीरशास्त्राशी संबंधित निरनिराळे आजार, त्यासाठी वापरात असलेली औषधे आदींचा अभ्यास व्यवस्थित करावा. याशिवाय ऊर्जा, ऊर्जा समस्या, भारताची संरक्षण व्यवस्था इत्यादींचा अभ्यास करावा.

हे देखील वाचा:

(सदर लेख डॉ. जी. आर. पाटील यांनी दैनिक लोकसत्ताच्या करिअर वृत्तान्त या सदरात लिहला आहे. दैनिक लोकसत्ताच्या संकेतस्थळावर आधी प्रसिध्द झाला आहे. तुमच्या प्रतिक्रिया लेखकाला [email protected] या मेल पाठवू शकता.)

विद्यार्थी मित्रांनो यानंतरही तुमचे काही प्रश्न असल्यास खालील कॉमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. ‘मिशन एमपीएससी’ टीमद्वारे तुमच्या शंकांचं निरसन करण्यात येईल. नियमित अपडेट मिळवण्यासाठी लाईक करा आमचे फेसबुक पेज – Mission MPSC

Join WhatsApp Group

Join Now

Join Telegram Channel

Join Now