देशातील सर्वात अवजड उपग्रह GSAT-11 चं प्रक्षेपण
- देशातील सर्वात अवजड उपग्रह म्हणजेच GSAT-11 चं प्रक्षेपण उपग्रहाचं बुधवारी सकाळी युरोपिअन अवकाश केंद्र फ्रेंच गुएना येथून प्रक्षेपण करण्यात आलं.करण्यात आलं.
- हा एक कम्युनिकेशन उपग्रह आहे, जो देशातील इंटरनेटचा वेग वाढवण्यास मदत करेल.
5,854 वजन हा उपग्रह इतका मोठा आहे की, प्रत्येक सोलार पॅनल चार मीटरपेक्षा मोठा आहे, जो एका मोठ्या रुमइतका असल्याचं सांगितलं जात आहे. - Gsat-6A च्या अपयशानंतर हा निर्णय घेण्यात आला होता. एप्रिल महिन्याच्या जवळपास Gsat-6A अनियंत्रित झाला होता आणि 29 मार्चला प्रक्षेपण होताच त्याचा संपर्क तुटला होता.
- यानंतर GSAT-11 चं प्रक्षेपण कऱण्याचा निर्णय घेण्यात आला होता. अनेक निरीक्षण आणि तपासण्या केल्यानंतरच GSAT-11 चं प्रक्षेपण करण्याला हिरवा कंदील दाखवण्यात आला.
- हा उपग्रह इंटरनेटच्या क्षेत्रात गेम चेंजर ठरेल असा दावा केला जात आहे. उपग्रहाचं काम सुरु झाल्यानंतर देशातील इंटरनेट स्पीडमध्ये क्रांती येईल. GSAT-11 च्या सहाय्याने प्रत्येत सेकंदाला 100 गीगाबाइट हून जास्त ब्रॉडबॅण्ड कनेक्टिव्हिटी मिळेल.
चार गुरुत्वीय लहरींची लायगो, व्हर्गो प्रकल्पात नोंद
- लायगो या आंतरराष्ट्रीय संशोधन प्रकल्पांतर्गत आणखी चार गुरुत्वीय लहरींचे अस्तित्व शोधण्यात आले असून, कृष्णविवरांच्या एकमेकांवरील आघातानंतरच्या विलीनीकरणातून गुरुत्वीय लहरींची निर्मिती होत असते.
- अमेरिकेतील लायगो व युरोपच्या व्हर्गो या गुरुत्वीय लहरी शोधक यंत्रांनी १० कृष्णविवरांच्या व एका न्यूट्रॉन ताऱ्यांच्या विलीनीकरणातून निर्माण झालेल्या गुरुत्वीय लहरींची नोंद केली आहे. यात गुरुत्वीय लहरी घटनांची नोंद GW170729, GW170809, GW170818, and GW170823 या नावांनी झाली असून, त्यातील जीडब्ल्यू १७०७२९ या गुरुत्वीय लहरी २९ जुलै २०१७ रोजी नोंदल्या गेल्या.
- १२ सप्टेंबर २०१५ ते १९ जानेवारी २०१६ या काळात पहिल्यांदा गुरुत्वीय लहरींच्या निरीक्षणाला लायगो प्रकल्पात सुरुवात करण्यात आली. त्यानंतर प्रगत लायगो प्रकल्पात तीन द्वैती कृष्णविवरांच्या विलीनीकरणातून आलेल्या गुरुत्वीय लहरी नोंदल्या गेल्या.
- ३० नोव्हेंबर २०१६ ते २५ ऑगस्ट २०१७ या काळात एका द्वैती न्यूट्रॉन ताऱ्याच्या विलीनीकरणातून व सात कृष्णविवरांच्या विलीनीकरण घटनातील गुरुत्वीय लहरी नोंदल्या गेल्या. जीडब्ल्यू १७०८१४ ही नोंद पहिल्या द्वैती कृष्णविवर मिलनातील असून ती तीन यंत्रांनी घेतली होती. त्यानंतर जीडब्ल्यू १७०८१७ या लहरींची नोंद जीडब्ल्यू १७०८१४ या लहरींच्या नोंदीनंतर झाली होती.
‘एस-४००’च्या सवलतीवर चर्चा
- रशियाकडून एस-४०० हवाई संरक्षण यंत्रणा प्रणाली खरेदी केल्यानंतर, भारतावर लादल्या जाऊ शकणाऱ्या निर्बंधांसह सर्व मुद्द्यांवर तोडगा काढू, असा विश्वास अमेरिकेचे संरक्षणमंत्री जेम्स मॅटिस यांनी व्यक्त केला.
- रशिया, इराण किंवा उत्तर कोरिया या देशांबरोबर संरक्षण करार केला, तर त्या देशांवर निर्बंध लादण्याची तरतूद अमेरिकेच्या ‘सीएएटीएसए’ कायद्यामध्ये तरतूद आहे. भारताने रशियाकडून एस-४०० हवाई संरक्षण प्रणाली खरेदी केली असून, त्याविषयी ऑक्टोबरमध्ये करार करण्यात आला आहे. हा करार पाच अब्ज डॉलरचा आहे. त्यामुळे, अमेरिका भारतावर निर्बंध लादेल का, याविषयी चर्चा होत असून, या करारावरून अमेरिकेने भारतावर दबावही वाढविला होता.
- अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून या कराराला सवलत मिळावी, असे भारताचे प्रयत्न आहेत. या पार्श्वभूमीवर, सीतारामन अमेरिकेच्या दौऱ्यावर आहेत. त्यामुळे या निर्बंधांचा मुद्दा चर्चेत आला आहे.
‘वर्ल्डकप हिरो’ गौतम गंभीर निवृत्त
- भारताचा सलामीवीर आणि २०११च्या विश्वविजेत्या भारतीय संघाचा हिरो गौतम गंभीरने अखेर आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम केला आहे. गंभीरने आज आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील कसोटी, वनडे आणि टी-२० अशा तिन्ही प्रकारांमधून निवृत्ती घेत असल्याचे जाहीर केले.
- डावखुरा सलामीवीर गौतम गंभीरची वर्ल्डकप हिरो अशी ओळख आहे. २००७ मधील टी-२० वर्ल्डकपचा अंतिम सामना आणि २०११च्या वनडे वर्ल्डकपच्या अंतिम सामन्यात गंभीरच्या जिगरबाज खेळीच्या जोरावर भारताने वर्ल्डकपला गवसणी घातली होती. गंभीरच्या नेतृत्वाखालीच आयपीएलमध्ये कोलकाता नाइट रायडर्सने २०१२ आणि २०१४ असे दोनवेळा जेतेपद पटकावले होते.
- गंभीर भारताकडून ५८ कसोटी, १४७ वनडे आणि ३७ टी-२० सामने खेळला. १५ वर्षांच्या प्रदीर्घ कारकीर्दीत त्याला अनेक चढउतार पाहायला मिळाले. गेल्या काही काळापासून त्याला संघात संधी मिळू शकली नव्हती. त्याचे परतीचे मार्ग जवळपास बंद झाले होते. त्या नाराजीतूनच गंभीरने आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा केल्याचे बोलले जात आहे.
ऑगस्टा वेस्टलँड घोटाळाप्रकरणी भारताला मोठे यश
- व्हीव्हीआयपी ऑगस्टा वेस्टलँड हेलिकॉप्टर घोटाळाप्रकरणी भारताला मोठे यश मिळाले आहे. ३६०० कोटी रुपयांच्या या घोटाळ्यातील कथीत दलाल आणि ब्रिटिश नागरिक ख्रिश्चिअन मिशेलला भारतात आणण्यात येत आहे. त्यासाठीची तयारी पूर्ण झाली असून भारताच्या तपास यंत्रणा मिशेलला मंगळवारी दुबईच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावर घेऊन गेले. त्यानंतर तेथून त्याला थेट भारतात आणण्यात येणार आहे.
- ऑगस्टा वेस्टलँडकडून सुमारे २२५ कोटी रुपये मिळाले होते. कंपनीने १२ हेलिकॉप्टरांच्या कराराला आपल्या बाजूने करण्यासाठी वास्तविक देवाण-घेवाणीच्या नावावर दिलेली लाच होती. फेब्रुवारी २०१७ मध्ये त्याला युएईमध्ये अटक करण्यात आली होती. दरम्यान, मिशेलच्या वकिलांनी आरोप केला होता की, केंद्रीय तपास पथक (सीबीआय) त्यांच्या आशिलावर दबाव टाकत आहे. आपल्यावरील हे आरोप सीबीआयने फेटाळले होते.
- जानेवारी २०१४ मध्ये भारताने या व्यवहाराचा इन्कार केला होता. सीबीआयनुसार या व्यवहारात २,६६६ कोटी रुपयांचे नुकसान होत होते. हा व्यवहार ८ फेब्रुवारी २०१० मध्ये करण्यात आला होता. त्यासाठी ५५६.२६२ मिलिअन युरोमध्ये १२ हेलिकॉप्टरांची खरेदी करण्यात येणार होती.