---Advertisement---

Current Affairs 20 April 2019

By Chetan Patil

Updated On:

---Advertisement---

मालीच्या पंतप्रधानांचा राजीनामा

  • वाढता हिंसाचार रोखण्यात आणि गेल्या महिन्यात झालेल्या हत्याकांडावरून चौफेर टीकेची झोड उठल्याने मालीचे पंतप्रधान सौमेलोयू बोबेय मॅगा यांनी आपल्या सरकारसह राजीनामा दिला. राष्ट्रध्यक्ष इब्राहिम बुबकर किटा यांनी मॅगा सरकारचा राजीनामा स्वीकृत केला आहे.
  • सत्तारूढ आणि विरोधी पक्षांचे खासदार बुधवारी सरकारविरुद्ध अविश्वास ठराव आणला होता. मॅगा आणि त्यांचे सरकार हिंसाचार रोखण्यात अपयशी ठरल्याचा आरोप खासदारांनी केला. लवकरच नवीन पंतप्रधान नियुक्त करून नवीन सरकार स्थापन केले जाईल.

‘आयएनएस इम्फाळ’ युद्धनौकेचे जलावतरण आज

  • नौदलाच्या विविध नौका व कायार्लयांना ‘आयएनएस’ (इंडियन नेव्ही शिप) उपाधी दिली जाते. या ‘आयएनएस’ नंतर त्या नौकेला एखादे शहर, नदी, पर्वतरांगा, शस्त्र किंवा संस्कृतमधील नाव असते. यामध्येच आता नौदलाने ईशान्य भारताला पहिल्यांदाच प्रतिनिधीत्व दिले आहे. मणिपूर राज्याच्या राजधानीच्या नावे ‘आयएनएस इम्फाळ’ या स्टेल्थ (कुठल्याही रडारमध्ये न येणाऱ्या) प्रकारातील युद्धनौकेचे जलावतरण होत आहे.
  • नौदलामध्ये दिल्ली, मुंबई व म्हैसूर या क्षेपणास्त्र डागणाऱ्या क्रुझ विनाशिका आहेत. तर कोलकाता, कोची व चेन्नई या ‘स्टेल्थ’ श्रेणीतील
  • क्षेपणास्त्र डागणाऱ्या युद्धनौकादेखील आहेत.
  • ६० किलो स्फोटकांचा १०० किमीपर्यंत मारा करणारे बराक क्षेपणास्त्र वाहण्याची क्षमता.
    – ४५० किमीपर्यंत १६ ‘ब्रह्मोस’ क्षेपणास्त्र डागण्याची क्षमता
    – दोन हेलिकॉप्टर वाहण्याची क्षमता
    – ७५०० टन वजन (विनाशिक श्रेणीतील सर्वाधिक वजन)

भारतासोबत अनौपचारिक बैठकीसाठी चीन तयार

  • ‘बीआरआय’बाबत भारताशी मतभेद असले तरी संबंध सुधारण्यासाठी भारताबरोबर ‘वुहान’सारखी बैठक घेण्यास तयार असल्याचे चीनने म्हटले आहे. चीन पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉरला भारताने विरोध करू नये, जम्मू-काश्मीरच्या भारताच्या मूलभूत भूमिकेच्या चीन आड येण्याचा प्रश्नच येत नाही, असे चीनचे परराष्ट्रमंत्री वांग यी यांनी म्हटले आहे.
  • पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांच्यात वुहान येथे झालेल्या बैठकीनंतर दोन्ही देशांत जे सुधारणेचे वातावरण निर्माण झाले आहे.

वेटलिफ्टर्सना ऑलिम्पिक पात्रतेची संधी

  • भारताची माजी जगज्जेती मीराबाई चानू हिच्यासह अन्य वेटलिफ्टर्सना टोक्यो 2020 ऑलिम्पिक पात्रता गाठण्याची संधी मिळणार आहे. Sports
    20 एप्रिल पासून सुरू होणाऱ्या आशियाई वेटलिफ्टिंग अजिंक्यपद स्पर्धेत चमकदार कामगिरी करण्याचे ध्येय भारतीय वेटलिफ्टर्सनी बाळगले आहे.
  • पाठीच्या दुखण्यामुळे तब्बल 9 महिने खेळापासून दूर राहावे लागलेल्या चानूने दमदार पुनर्रागमन करत ऑलिम्पिकसाठीच्या दावेदारीसाठी सज्ज असल्याचे संकेत दिले होते.
  • फेब्रुवारीत थायलंडमध्ये झालेल्या ईजीएटी चषक स्पर्धेत चानूने स्नॅच प्रकारात 82 तर क्लिन अ‍ॅण्ड जर्क प्रकारात 110 किलो वजन उचलत सुवर्णपदकाला गवसणी घातली होती. त्यामुळे तिचा आत्मविश्वास वाढला होता. मात्र ऑलिम्पिक पात्रता गाठायची असल्यास चानूला आपली कामगिरी उंचवावी लागणार आहे.

Join WhatsApp Group

Join Now

Join Telegram Channel

Join Now