⁠  ⁠

Current Affairs 26 July 2019

Chetan Patil
By Chetan Patil 3 Min Read
3 Min Read

ब्रिटनच्या गृहमंत्रीपदी गुजराती महिलेची नियुक्ती

  • ब्रिटनचे माजी परराष्ट्र मंत्री आणि लंडनचे माजी महापौर बोरिस जॉन्सन ब्रिटन यांनी पंतप्रधानपदाची शपथ घेतली.
    माजी पंतप्रधान थेरेसा मे यांनी राजीनामा दिल्यानंतर बोरिस जॉन्सन हे ब्रिटनच्या पंतप्रधानपदी विराजमान झाले आहेत. बोरिस यांच्या मंत्रीमंडळाचीही घोषणा झाली असून त्यामध्ये एका भारतीय वंशाच्या महिलेचा समावेश आहे.
  • बोरिस यांच्या मंत्रीमंडळात प्रीती पटेल यांना गृहमंत्री पदावर नियुक्त करण्यात आले आहे. गृहमंत्री पदी विराजमान होणाऱ्या पटेल या भारतीय वंशाच्या पहिल्या व्यक्ती ठरल्या आहेत. विशेष म्हणजे पटेल यांच्या नियुक्तीमुळे ब्रिटनमध्ये पहिल्यांदाच एक गुजराती व्यक्ती गृहमंत्री झाली आहे.
  • ब्रेग्झिटवरुन ब्रिटन सरकारवर उघडपणे टिका करणाऱ्या पटेल या बोरिस यांच्या समर्थक आहेत. पटेल या कंझर्वेटीव्ह पक्षाच्या ‘बॅक बोरिस’ मोहिमेच्या प्रमुख सदस्यांपैकी एक होत्या.

संघटनांसह व्यक्तीही दहशतवादी ठरवण्याचा सरकारला अधिकार

  • केवळ संघटनाच नव्हे तर व्यक्तीलाही दहशतवादी घोषित करण्याचा अधिकार केंद्र सरकारला देणारे अवैध कृत्य प्रतिबंधक कायदा दुरुस्ती विधेयक (यूएपीए) बुधवारी लोकसभेत २८७ विरुद्ध ७ मतांनी संमत करण्यात आले. या दुरुस्तीमुळे दहशतवादविरोधात लढण्यासाठी तपास यंत्रणांना अधिक बळ मिळेल, असा दावा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केला.
  • एखादी व्यक्ती सरकारविरोधात बोलत असताना ती देशप्रेमीही असू शकते. सरकारला विरोध केला की त्याला देशविरोधी का ठरवले जाते, असा सवाल उपस्थित करून तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोईत्रा यांनी राज्याच्या अधिकारावर नियंत्रण आणले जात असल्याचा मुद्दा मांडला.
  • आत्तापर्यंत फक्त संघटनानाच दहशतवादी घोषित केले जात होते. या कायदादुरुस्तीमुळे व्यक्तींनाही दहशतवादी घोषित करता येईल.दहशतवादासंदर्भातील प्रकरणात इन्स्पेक्टर वा त्यापेक्षा वरिष्ठ दर्जाच्या अधिकाऱ्यालाही चौकशी करण्याचे अधिकार. यापूर्वी उपजिल्हाप्रमुख (एसपी) वा साहाय्यक पोलीस आयुक्त वा त्यापेक्षा वरिष्ठ दर्जाच्या अधिकाऱ्याला चौकशीचे अधिकार होते.
  • राष्ट्रीय तपास यंत्रणा (एनआयए)चा अधिकारी चौकशी करत असेल, तर एनआयएच्या महासंचालकांच्या परवानगीने मालमत्ता जप्त करण्याचे अधिकार देण्यात आले आहेत.

अर्थसचिव सुभाष चंद्र गर्ग यांची ऊर्जा विभागात बदली

  • आर्थिक आघाडीवर निराशाजनक स्थिती असताना केंद्राचे अर्थसचिव सुभाषचंद्र गर्ग यांची बुधवारी ऊर्जासचिवपदी बदली करण्यात आली. मावळते ऊर्जासचिव अजयकुमार भल्ला यांच्याकडे गृहसचिवपदाची सूत्रे येणार आहेत.
  • प्रशासनात ज्येष्ठ पातळीवर मोठे फेरबदल करण्यात आले आहेत. त्यानुसार, अर्थसचिव सुभाषचंद्र गर्ग यांची ऊर्जा विभागात बदली करण्यात आली.
  • रिझव्‍‌र्ह बॅंकेच्या स्वायत्ततेच्या मुद्यावर रिझव्‍‌र्ह बॅंकेचे तत्कालीन डेप्युटी गव्हर्नर विरल आचार्य आणि सुभाषचंद्र गर्ग यांच्यात वाद रंगला होता. आता आर्थिक आघाडीवर निराशानक स्थिती असताना गर्ग यांची बदली करण्यात आली आहे. १९८५ च्या तुकडीचे गुजरात कॅडरचे आयएएस अधिकारी अतनू चक्रवर्ती यांची आता अर्थसचिवपदी नियुक्ती करण्यात आली.
  • मावळते ऊर्जा सचिव अजयकुमार भल्ला यांची सरकारने बुधवारी गृहमंत्रालयात विशेष कार्यपालन अधिकारी (ओएसडी) म्हणून नियुक्ती केली.

गजानन कीर्तिकर यांचा अध्यक्षपदाचा राजीनामा

  • खासदार गजानन कीर्तिकर यांनी मुंबई उपनगर कबड्डी संघटनेच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. राष्ट्रीय क्रीडा संहितेच्या दडपणामुळे ७५ वर्षीय कीर्तिकर यांनी हा निर्णय घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली.
  • २०११ पासून कीर्तिकर उपनगर कबड्डी संघटनेच्या अध्यक्षपदावर होते. परंतु कीर्तिकर यांच्यावर राष्ट्रीय क्रीडा संहितेची टांगती तलवार होती. त्यामुळे त्यांनी पदाचा राजीनामा दिल्याचे म्हटले जात आहे.

Share This Article