ओल्गा, पीटर हँडके यांना साहित्याचे नोबेल
पोलंडच्या प्रख्यात लेखिका ओल्गा तोकार्झूक यांना २०१८ चा तर ऑस्ट्रियाचे लेखक पीटर हँडके यांना २०१९ चा साहित्यातील नोबेल पुरस्कार जाहीर झाला आहे. ५७ वर्षीय ओल्गा या पोलीश लेखिका, मानवाधिकार कार्यकर्त्या आणि बुद्धीजीवी व्यक्ती आहेत. व्यावसायिकदृष्ट्या सर्वाधिक यशस्वी लेखकांपैकी त्या एक आहेत. पीटर हँडके (७६) यांनी आपल्या आईच्या आत्महत्येनंतर ‘द सॉरो बियाँड ड्रीम्स’ हे पुस्तक लिहिले. पाच वर्षांपूर्वी त्यांनी नोबेल पुरस्कारावरच टीका केली होती, हे विशेष होय. दुसऱ्या महायुद्धानंतर सर्वात प्रभावी लेखक म्हणून ते नावारुपाला आले.
चार वजन गटात पदके जिंकणारी मेरी कोम ठरली जगातील पहिली महिला बॉक्सर
उलान-उडे (रशिया) | विश्व बॉक्सिंग अजिंक्यपद स्पर्धेत भारताच्या एम. सी. मेरी कोमने (३६) ५१ किलो वजनगटात उपांत्यफेरी गाठत पदक निश्चित केले. या स्पर्धेत चार वजनगटात ८ पदके जिंकणारी ती जगातील पहिली खेळाडू ठरली. तिने ६ सुवर्ण व एक रौप्य पटकावले आहे. आता तिला आठवे पदक मिळेल.
५० रेल्वे स्थानके, १५० गाडय़ांचे खासगीकरण
रेल्वे क्षेत्रातील खासगीकरणाला नीती आयोगाने गती दिली असून देशातील ५० रेल्वे स्थानके आणि १५० रेल्वे गाडय़ांचे व्यवस्थापन खासगी कंपन्यांकडे सोपवले जाणार आहे. ही प्रक्रिया नीती आयोगाच्या कार्यकारी अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली सचिव स्तरावरील उच्चाधिकार समिती पार पाडेल, असा निर्णय रेल्वे मंडळाने घेतला.