HPCL मुंबई येथे 85,000 रुपये पगाराची नोकरी, असा करा अर्ज

Published On: ऑक्टोबर 17, 2021
Follow Us

हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड मुंबई येथे विविध पदांच्या भरतीसाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. यासाठी पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या लिंकवर ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 ऑक्टोबर 2021 असणार आहे.

पदाचे नाव :

१) फिक्स्ड टर्म रिसर्च असोसिएट्स
शैक्षणिक पात्रता :
उमेदवारांनी इंजिनिअरिंग/केमेस्ट्री/ सायन्समध्ये Ph.D केली असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी शिक्षणादरम्यान सर्व सेमिस्टर्समध्ये 60% मार्क्स घेतले असणं आवश्यक आहे..उमेदवारांना संबंधित विषयांमध्ये अनुभव असणं आवश्यक.

२) फिक्स्ड टर्म प्रोजेक्ट असोसिएट्स
शैक्षणिक पात्रता :
उमेदवारांनी केमेस्ट्रीमध्ये MSc/BSc केलं असणं आवश्यक आहे. तसंच केमिकल इंजिनिअरिंग किंवा केमिकल टेक्नॉलॉजीमध्ये डिप्लोमा केला असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित विषयांमध्ये अनुभव असणं आवश्यक.

इतका मिळणार पगार

फिक्स्ड टर्म रिसर्च असोसिएट्स – 65,000/- ते 85,000/- रुपये प्रतिमहिना

फिक्स्ड टर्म प्रोजेक्ट असोसिएट्स- 40,000/- ते 50,000/- रुपये प्रतिमहिना

अर्ज पद्धती : ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 31 ऑक्टोबर 2021

अधिकृत संकेतस्थळ : hindustanpetroleum.com

जाहिरात (Notification) पाहण्यासाठी  : येथे क्लिक करा

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Comments are closed.