पहिल्या परीक्षेत अपयश, पण दुसऱ्या प्रयत्नात बनली उपनिरीक्षक

Published On: ऑगस्ट 10, 2023
Follow Us

MPSC PSI Success Story : वडील शिक्षक, त्यामुळे लहानपणापासूनच शिक्षिकाच व्हायचे, असेच स्वप्न रुबियाने रंगविले होते. पदवी घेतल्यावर तिने डी.एड. केले. त्यानंतर पदव्युत्तर पदवीही घेतली. परंतु, शिक्षक भरतीच्या परीक्षा होत नसल्याने निराश झालेल्यान रुबियाने स्पर्धा परीक्षेचा अभ्यास सुरू केला. दुसऱ्या प्रयत्नात उपनिरीक्षक पदाला गवसणी घातली. एवढेच नव्हे, तर तिने प्रशिक्षणात बेस्ट कॅडेट इन ड्रीलचा किताबही पटकावला आहे. रुबिया जहीरा ताजुद्दीन मुलाणी ही मूळची सुभाषनगरची (ता. मिरज, जि. सांगली) रहिवासी आहे. रुबियाचे वडील ताजुद्दीन मुलाणी हे शिक्षक, तर आई गृहिणी आहे. सुशिक्षित घरात असल्याने सर्वांमध्ये शिक्षणाची गोडी आधीपासूनच होती. रुबियाचे एक चुलते आर्मीत सैनिक आहेत, तेवढाच काय तो खाकीशी संबंध.

रुबियानेही शिक्षिका होण्यासाठी ‘टीईटी’ची स्पर्धा परीक्षेची तयारी केली. परंतु, मधल्या काळात परीक्षात होत नव्हत्या. त्यामुळे शिक्षक भरतीही रखडली. परिणामी, तिने पुणे गाठले आणि २०१७ पासून स्पर्धा परीक्षांची तयारी सुरू केली.पहिल्या परीक्षेत अपयश पदरी आले. परंतु, त्याने खचून न जाता पुन्हा तयारी केली आणि २०१९ मध्ये झालेल्या उपनिरीक्षकांच्या परीक्षेत यश नोंदविले.

जिद्द असली तर माणूस कोणत्याही परिस्थितीवर मात करून यश मिळवूनच दाखवतो. कधीकधी ठरवलेलं होईलच असे नसते. परंतु, तेव्हा खचून न जाता नव्याने कशाप्रकारे भरारी घ्यावी, हे आपण रुबियाच्या प्रवासातून शिकू शकतो. पदरी पडलेल्या अपयशाला आत्मविश्वासाने सामोरे जाऊन यश साध्य करता येते. त्यामुळेच, घरातीलच नव्हे, तर त्यांच्या मुलाणी परिवारातील (खानदान) ती पहिलीच पोलिस अधिकारी झालेली महिला आहे. त्याचा सार्थ अभिमान तिच्या आई-वडीलांना आहे.

अलीकडे मुले-मुली आपल्या नावापुढे वडिलांच्या नावाबरोबरच आईचेही नाव लावतात. परंतु, ते कागदोपत्री असतेच, असे नाही. रुबिया हिने मात्र आपल्या वडिलांसह आईचेही नाव असलेली नेमप्लेट खाकी वर्दीवर लावलेली आहे, हे तिचे वेगळेपण बरेच काही सांगून जाते. रुबिया जहिरा ताजुद्दीन मुलाणी अशी नेमप्लेट लावलेली बहुधा ती आज प्रशिक्षण पूर्ण केलेली पहिली पोलिस महिला उपनिरीक्षक असावी.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Related Posts

वाह रे पठ्ठया! पहिल्याच प्रयत्नात पुण्याचा २२ वर्षीय तरुण झाला आयएएस

एप्रिल 23, 2025

यवतमाळच्या रिक्षाचालकाच्या लेकीने केली UPSC क्रॅक ; आता होणार जिल्हाधिकारी

एप्रिल 23, 2025
police

कोणतेही क्लासेस न लावता मारली MPSC परीक्षेत बाजी ; बनला पोलीस उपनिरीक्षक

एप्रिल 14, 2025

IAS होण्यासाठी तीन वेळा यूपीएससी क्रॅक केली ; चारू यांचा प्रेरणादायी प्रवास वाचा..

एप्रिल 1, 2025

डॉक्टर झाल्यानंतर UPSC परीक्षा देण्याचा निर्णय ; तिसऱ्या प्रयत्नात मिळविले यश, वाचा IFS अपाला मिश्रांचा प्रेरणादायी प्रवास

मार्च 19, 2025

राहण्यासाठी घर नाही, दोन वेळच्या जेवणाचेही पैसे नव्हते ; पठ्ठ्याने जिद्दीने UPSC क्रॅक केली अन् बनला IAS

मार्च 17, 2025