मोलमजुरी करणाऱ्या कामगाराचा पोरगा झाला कलेक्टर…

Published On: एप्रिल 27, 2024
Follow Us

UPSC IAS Success Story : शाहूपुरी घोरपडे गल्लीत दहा बाय दहाच्या खोलीत संसार थाटलेल्या जमादार यांना फरहान व फरदीन ही दोन मुले. खिळे जुळणीच्या व्यवसायातून आई, पत्नी व दोन मुलांचा सांभाळ केला. त्याच्या वडिलांनी सुरूवातीला खिळे जुळविण्याचे काम केले..तर काही काळाने खाजगी प्रिंटिंग प्रेसमध्ये कामगार होते. पण मुलाला उच्च शिक्षित केले.

फरहानने देखील ठरवले की होणार तर कलेक्टरच… त्यानुसार त्याने तयारी केली. सर्वसामान्य कुटुंबातून आल्याने या पदाचा सर्वसामान्यांना कसा उपयोग होईल हीच‌ त्याने दुरदृष्टी ठेवली आहे. नुकतीच, इरफान अल्लाबक्ष जमादार यांच्या फरहान जमादार याने खडतर केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा देऊन कलेक्टपदाला गवसणी घातली. मुस्लिम समाजातील या मुलाने तरुण पिढीसमोर एक आदर्श निर्माण केला आहे.

फरहानने चौथीपर्यंतचे शिक्षण महापालिकेच्या एस्तेर पॅटर्न शाळेत घेतले. पाचवी ते आठवीपर्यंत दादासाहेब मगदूम हायस्कूल व नववी-दहावी सुसंस्कार हायस्कूल, कदमवाडी येथे घेतले. अकरावी आणि बारावी विवेकानंद कॉलेजमधून पूर्ण करून बी.टेक.साठी सांगलीच्या वालचंद कॉलेजमध्ये प्रवेश घेतला.परिस्थितीची जाणीव असल्याने आजही फरहान सायकलचा वापर करतो. पदवीनंतर स्पर्धा परीक्षेला सामोरे गेल्यानंतर पहिल्या प्रयत्नात अपयश आले; मात्र खचून न जाता त्याने पुन्हा दोनवेळा परीक्षा दिली. सलग तीनवेळा अपयश आल्याने स्पर्धा परीक्षेचा नाद सोडण्याचा विचार केला;

मात्र आई- वडील आणि मित्रांच्या प्रोत्साहनामुळे त्याने चौथा प्रयत्न केला. या प्रयत्नात मात्र त्याने यशाला गवसणी घातली. एवढेच नाही, तर देशात १९१ वा क्रमांक मिळविला. लेखी परीक्षा पास झाल्यानंतर त्याने वर्षभर दिल्लीमधून अभ्यास केला. या मेहनतीला अखेर यश मिळाले.सायकलवरून सुरू झालेला प्रवास त्याला थेट आयएएस अधिकाऱ्यापर्यंत घेऊन गेला. यूपीएससी परीक्षेत देशात १९१ वी रँक मिळवत पूर्ण झाला.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Related Posts

वाह रे पठ्ठया! पहिल्याच प्रयत्नात पुण्याचा २२ वर्षीय तरुण झाला आयएएस

एप्रिल 23, 2025

यवतमाळच्या रिक्षाचालकाच्या लेकीने केली UPSC क्रॅक ; आता होणार जिल्हाधिकारी

एप्रिल 23, 2025
police

कोणतेही क्लासेस न लावता मारली MPSC परीक्षेत बाजी ; बनला पोलीस उपनिरीक्षक

एप्रिल 14, 2025

IAS होण्यासाठी तीन वेळा यूपीएससी क्रॅक केली ; चारू यांचा प्रेरणादायी प्रवास वाचा..

एप्रिल 1, 2025

डॉक्टर झाल्यानंतर UPSC परीक्षा देण्याचा निर्णय ; तिसऱ्या प्रयत्नात मिळविले यश, वाचा IFS अपाला मिश्रांचा प्रेरणादायी प्रवास

मार्च 19, 2025

राहण्यासाठी घर नाही, दोन वेळच्या जेवणाचेही पैसे नव्हते ; पठ्ठ्याने जिद्दीने UPSC क्रॅक केली अन् बनला IAS

मार्च 17, 2025