MPSC PSI Success Story : एखादा गावातील मुलगा प्रशासकीय अधिकारी होतो तेव्हा संपूर्ण गावासाठी ही अभिमानाची गोष्ट बनते. खरंतर हा जिद्दीचा प्रवास असतो. सेनगाव तालुक्यातील बोरखेडी (पिनगाळे) या गावचा रविंद्र चव्हाण हा लेक. शेतकरी कुटुंबात त्याचा जन्म झाला आहे. अवघी सात एकर जमीन आणि एकत्रित कुटूंब…एक दिवस आपल्या आई – वडिलांचे स्वप्न साकार करायचे यासाठी त्याने दिवसरात्र मेहनत घेतली.
रविंद्र प्रकाश चव्हाण याचे प्राथमिक शिक्षण गावातील जिल्हा परिषद शाळेत सातवीपर्यंत झाले. त्यानंतर आठवी ते बारावीपर्यंचे शिक्षण परभणी येथील भारत भारती विद्यालयात झाले. रविंद्रच्या घरची परिस्थिती हलाखीची असून वडीलही कमी शिकलेले आहेत. त्यामुळे शिक्षणाचा वारसा तसा घरात म्हणावा तेवढा नाही. परंतु मोठे व्हायचे म्हणून रवींद्र चव्हाण याने शिक्षणाला अधिक महत्त्व दिले.
सन २०१८ पासून पुण्यात स्पर्धा परीक्षेची तयारी सुरू केली. त्याला पहिल्याच प्रयत्नात पीएसआय हे पद मिळाले. आपला मुलगा साहेब झाला म्हणून आई – वडिलांचा आनंद गगनात मावेनासा झाला. तो गावचा अभिमान देखील बनला. त्याला बघून गावातील अनेक तरूण या क्षेत्रात येतील, ही खात्री आहे.















