इंजिनिअरिंग क्षेत्रातील नोकरी सोडून घेतला प्रशासकीय सेवेचा ध्यास अन् अभिजय झाला UPSC परीक्षा उत्तीर्ण !

Published On: जून 11, 2024
Follow Us

UPSC Success Story कोणतीही परीक्षा असली तरी संयम खूप महत्त्वाचा आहे.‌तसेच अभिजय पगारेला पहिल्या प्रयत्नात अपयश आले परंतू खचून न जाता जोमाने अभ्यास केला आणि यश मिळवले. जालन्याच्या अभिजय पगारे याने देशात ८४४वा क्रमांक मिळविला आहे. पहिल्या प्रयत्नात मुलखात दिल्यानंतर त्याच्या पदरी अपयश आलं होतं. मात्र या अपयशाने खचून न जाता त्याने तयारी सुरूच ठेवली. दुसऱ्या प्रयत्नात मात्र यश मिळाले.

अभिजयची जडणघडण ही जालना जिल्ह्यात झाली. त्याचे वडील हे जेईएस महाविद्यालयातील उपप्राचार्य आहेत. त्यामुळे लहानपणापासून घरात शैक्षणिक वातावरण होते. त्याचे शालेय शिक्षण ते बारावीपर्यंतचे शिक्षण हे जालना जिल्ह्यातच झाले. त्यानंतर एनआयटी वारंगल येथे त्याने कॉम्प्युटर सायन्समध्ये पदवी मिळविली. पदवी मिळाल्यानंतर अभिजय पगारे याने बंगळूरू येथील एका कंपनीत सॉफ्टवेअर अभियंता म्हणून नोकरी स्वीकारली. पण नोकरीत त्याचे काही मन रमले नाही. त्यामुळे त्याने प्रशासकीय सेवेत जाण्यासाठी स्पर्धा परीक्षेची तयारी करण्याचा निर्णय घेतला. त्याने सुरूवातीला नोकरी करून अभ्यास केला‌. पण त्यात ताळमेळ न बसल्याने अपयश येत होते. पुढे त्याने पुन्हा जोमाने अभ्यासाला सुरुवात केली.

या दुसऱ्या प्रयत्नात मात्र त्याला यश मिळाले. यूपीएससीच्या निकालात त्याने ८४४वा क्रमांक मिळवला आहे. प्राप्त क्रमांकानुसार इंडियन फॉरेन सर्व्हिस किंवा इंडियन रेव्ह्यून्यू सर्व्हिसमध्ये नोकरीची संधी मिळणार आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Related Posts

वाह रे पठ्ठया! पहिल्याच प्रयत्नात पुण्याचा २२ वर्षीय तरुण झाला आयएएस

एप्रिल 23, 2025

यवतमाळच्या रिक्षाचालकाच्या लेकीने केली UPSC क्रॅक ; आता होणार जिल्हाधिकारी

एप्रिल 23, 2025
police

कोणतेही क्लासेस न लावता मारली MPSC परीक्षेत बाजी ; बनला पोलीस उपनिरीक्षक

एप्रिल 14, 2025

IAS होण्यासाठी तीन वेळा यूपीएससी क्रॅक केली ; चारू यांचा प्रेरणादायी प्रवास वाचा..

एप्रिल 1, 2025

डॉक्टर झाल्यानंतर UPSC परीक्षा देण्याचा निर्णय ; तिसऱ्या प्रयत्नात मिळविले यश, वाचा IFS अपाला मिश्रांचा प्रेरणादायी प्रवास

मार्च 19, 2025

राहण्यासाठी घर नाही, दोन वेळच्या जेवणाचेही पैसे नव्हते ; पठ्ठ्याने जिद्दीने UPSC क्रॅक केली अन् बनला IAS

मार्च 17, 2025