रोशनने एमपीएसी परीक्षेत यश मिळवून केले कुटुंबियांचे नाव ‘रोशन’ !

Published On: सप्टेंबर 18, 2024
Follow Us

MPSC Success Story : आपल्याला जर कुटुंबाची साथ असेल तर यशाची पायरी सहज गाठता येते. हेच रोशन याने करून दाखवले. रोशन चट्टे हा चिंचवड येथील रस्टन कॉलनीत राहाणारा लेक‌. त्याचे वडील खाजगी कंपनीत कॅन्टीन सुपरवायझर म्हणून नोकरी करतात. तर आई गृहिणी आहे. रोशनचे प्राथमिक ते पदवी शिक्षण हे चिंचवडमध्येच झाले. त्यानंतर त्याने स्पर्धा परीक्षेची तयारी करायला सुरुवात केली. सुरूवातीला युपीएससीसाठी प्रयत्न केला.

काही गुणांसाठी मुख्य परीक्षेत यश हुकले. पुन्हा परीक्षा दिली तर पुन्हा अपयश आले. म्हणून ते एमपीएससीच्या दिशने वळले. इकडेही दोनदा प्रयत्न केला पूर्व परीक्षा उत्तीर्ण होऊनही मुख्य परीक्षेत काही गुणांनी संधी गेली. त्यात लॉकडाऊन लागले. या काळात त्याने मराठी व इंग्रजीचा पाया मजबूत केला. इतर पेपरचा सराव केला. त्यामुळे त्यांना लॉमध्ये ५५ पैकी ५२ गुण मिळाले.

तर मुख्य परीक्षेत ३०७ गुण मिळाले.पण कोरोना असल्याने परीक्षा चार – पाच वेळा पुढे ढकलण्यात आली. त्यात निकालही उशीरा लागला. पण तिसऱ्या प्रयत्नात रोशन पोलिस उपनिरीक्षक झाला. भविष्यात तो क्लास वन साठी प्रयत्न करणार आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Related Posts

वाह रे पठ्ठया! पहिल्याच प्रयत्नात पुण्याचा २२ वर्षीय तरुण झाला आयएएस

एप्रिल 23, 2025

यवतमाळच्या रिक्षाचालकाच्या लेकीने केली UPSC क्रॅक ; आता होणार जिल्हाधिकारी

एप्रिल 23, 2025
police

कोणतेही क्लासेस न लावता मारली MPSC परीक्षेत बाजी ; बनला पोलीस उपनिरीक्षक

एप्रिल 14, 2025

IAS होण्यासाठी तीन वेळा यूपीएससी क्रॅक केली ; चारू यांचा प्रेरणादायी प्रवास वाचा..

एप्रिल 1, 2025

डॉक्टर झाल्यानंतर UPSC परीक्षा देण्याचा निर्णय ; तिसऱ्या प्रयत्नात मिळविले यश, वाचा IFS अपाला मिश्रांचा प्रेरणादायी प्रवास

मार्च 19, 2025

राहण्यासाठी घर नाही, दोन वेळच्या जेवणाचेही पैसे नव्हते ; पठ्ठ्याने जिद्दीने UPSC क्रॅक केली अन् बनला IAS

मार्च 17, 2025