कोपर्डी येथील अल्पवयीन मुलीवर बलात्कार व खून खटल्यातील मुख्य आरोपी जितेंद्र शिंदे, दुसरा आरोपी संतोष भवाळ, तिसरा आरोपी नितीन भैलुमे यांना अहमदनगर जिल्हा सत्र न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली. ऑक्टोबर २०१६ पासून जिल्हा सत्र न्यायाधीश सुवर्णा केवले यांच्यासमोर या खटल्याचे कामकाज चालले. एक वर्ष व एक महिन्यानंतर या खटल्याचा अंतिम फैसला लागला आहे. १३ जुलै २०१६ रोजी सायंकाळी कोपर्डीत नववीत शिकणाऱ्या मुलीवर बलात्कार करुन खून करण्यात आला. तिच्या चुलतभावाने दिलेल्या फिर्यादीवरुन पोलिसांनी गुन्हा नोंदवला. पोलिसांनी जितेंद्र ऊर्फ पप्पू शिंदे याला अटक केली. नंतर संतोष भवाळ नितीन भैलुमे यांना अटक करण्यात अाली. या गुन्ह्यातील आरोपींना कठोर शिक्षा व्हावी, पीडित मुलीला न्याय मिळावा या मागणीसाठी राज्यभर मोर्चे निघाले. पोलिसांनी तीन महिन्यांत दोषारोपपत्र तयार करुन २० ऑक्टोबर २०१६ रोजी न्यायालयात दाखल केले. मुख्य आरोपी शिंदे याच्याविरुद्ध बलात्कार, खून पॉस्को कायद्यानव्ये दोषारोप ठेवण्यात आले. इतर दोन आरोपींविरुद्ध छेडछाड करणे संगमनताने कट रचण्याचे दोष ठेवण्यात अाले. सरकार पक्षातर्फे विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करण्यात आली. त्यांनी सरकार पक्षातर्फे पाच महिन्यांत ३१ साक्षीदार तपासले. मुख्य आरोपीच्या वतीने वकीलपत्र घेण्याचा ठराव नगरच्या वकील संघटनेने केला होता. त्यामुळे त्याची बाजू मांडण्यासाठी विधी सेवा प्राधिकरणाच्या वतीने ज्येष्ठ विधिज्ञ अॅड. योहान मकासरे यांची नियुक्ती करण्यात आली. दुसरा आरोपी संतोष भवाळ याच्या वतीने अॅड. बाळासाहेब खोपडे, त्यांची कन्या अॅड. विजयालक्ष्मी खोपडे यांनी काम पाहिले. तिसरा आरोपी नितीन भैलुमे याच्या वतीने अॅड. प्रकार आहेर यांनी काम पाहिले.
LATEST Post
स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत 1748 जागांसाठी भरती
Published On: सप्टेंबर 3, 2026
बँक ऑफ इंडिया मध्ये विविध पदांच्या 205 जागांसाठी भरती
Published On: सप्टेंबर 2, 2026
IBPS मार्फत 13,706 जागांसाठी महाभारती; पदवीधरांना नोकरीची संधी
Published On: सप्टेंबर 1, 2026
राष्ट्रीय माहिती विज्ञान केंद्रात सरकारी नोकरी संधी ; 376 जागांसाठी भरती
Published On: ऑगस्ट 29, 2026
भारतीय डाक विभागात 23,757 जागांसाठी मेगाभरती; 10वी उत्तीर्णांना नोकरीची संधी
Published On: ऑगस्ट 28, 2026
भारतीय रेल्वेत सरकारी नोकरीची उत्तम संधी! तब्बल 4029 जागांसाठी भरती
Published On: ऑगस्ट 20, 2026
NTPC ग्रीन एनर्जी लि. मध्ये 147 जागांसाठी भरती
Published On: ऑगस्ट 19, 2026
पुणे आयकर विभागात विविध पदांसाठी भरती
Published On: ऑगस्ट 18, 2026















