ऑस्करच्या फॉरेन लँग्वेज कॅटेगरीतून ‘न्यूटन’ बाहेर

Published On: डिसेंबर 16, 2017
Follow Us
Newton

ऑस्कर पुरस्कारांच्या शर्यतीत भारतातर्फे मराठमोळ्या दिग्दर्शक अमित मसुरकरचा ‘न्यूटन’ हा सिनेमा सहभागी झाला होता.

ऑस्करच्या फॉरेन लँग्वेज कॅटेगरीत न्यूटनला नामांकन मिळाले होते. पण आता हा चित्रपट या शर्यतीतून बाहेर पडला आहे. ऑस्करच्या ट्विटर हँडलवर जाहिर करण्यात आलेल्या 9 चित्रपटांच्या यादीत न्यूटनचा उल्लेख नाहीये. या यादीत ‘अ फॅनटॅस्टिक वुमन’, ‘इन द फेड’, ‘ऑन बॉडी ऐंड सोल’, ‘फॉक्सट्राट’, ‘दि इनसल्ट’ , ‘लवलेस’, ‘द वुंड’, ‘फेलिसिटे’, ‘द स्क्वायर’ या चित्रपटांना स्थान मिळाले आहे. ‘द अकॅडमी’च्या ट्विटर हँडलवर असलेल्या ट्वीटमध्ये लिहिण्यात आले आहे.

फॉरेन लँग्वेज फिल्म अवॉर्डच्या यादीत नऊ चित्रपटांचा उल्लेख आहे. फिल्म फेडरेशन ऑफ इंडियाच्या निवड समितीने 26 चित्रपटांमधून ‘न्यूटन’ला ऑस्करसाठी पाठवण्याचा निर्णय घेतला होता. राजकुमार राव या चित्रपटात मुख्य भूमिकेत असून मराठमोळ्या अमित मसुरकरने याचे दिग्दर्शन केले आहे. छत्तीसगडच्या नक्षलवादी परिसरात काम करणाऱ्या एका कर्मचाऱ्याची ही कहाणी असून, यात राजकीय परिस्थितीवर भाष्य करण्यात आले आहे. राजकुमारने यात न्यूटन कुमारची भूमिका साकारली आहे. राजकुमारशिवाय पंकज त्रिपाठी, संजय मिश्रा, अंजली पाटील, रघुबीर यादव यांच्याही मुख्य भूमिका आहेत.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now