सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी महत्वाची बातमी आहे. मुंबई महानगरपालिकेत तब्बल 3 हजारहून अधिक पदं रिक्त आहेत. त्यासाठी भरतीची प्रक्रिया सुरू होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
सध्या BMC मध्ये आरोग्य, शिक्षण, तांत्रिक आणि इतर विभागांमध्ये ही रिक्त पदं असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे बेरोजगार युवकांसाठी मोठी संधी निर्माण होण्याची शक्यता आहे. या भरतीबाबत लवकरच जाहिरात प्रसिद्ध होणार असल्याचं प्रशासनाकडून संकेत येत आहेत.
इच्छुक उमेदवारांनी अधिकृत वेबसाईटवर लक्ष ठेवण्याचं आवाहन केले जात आहे. जर बृहन्मुंबई महानगरपालिकेत भरती निघाली तर हजाो तरुणांसाठी सरकारी नोकरी करण्याची ही उत्तम संधी असणार आहे. यामुळे युवकांना फायदा होणार आहे.







