नमस्कार मित्रांनो,
आयोगाने जाहीर केलेल्या अंदाजित वेळापत्रकानुसार १० एप्रिल २०१६ रोजी होणाऱ्या राज्यसेवा पूर्व या परीक्षेच्या अनुषंगाने ‘मिशन एमपीएससी’तर्फे आगामी राज्यसेवा परीक्षेच्या अनुषंगाने मार्गदर्शनपर लेखनमाला सुरु करत आहोत.
स्पर्धा परीक्षा व MPSC / UPSC विषयी झालेली जागृती व उत्साह यामुळे येणाऱ्या व या पुढील किमान 3 वर्षातील सर्वच परिक्षांसाठी महाराष्ट्रातून लाखो पदवीधर फॉर्म भरतील. दिवसेंदिवस ही संख्या वाढत जाईल यातही कोणालाच शंका नसेलच. अर्थात या सर्व गोष्टी आपणास माहित आहेतच व त्याला भिण्याचे काही कामच नाही. आपण हे सर्व जाणूनच या क्षेत्रात आला आहेत तेव्हा एकदा ठरवलंय ना मग… एकदा.. धडपडू… हरू… सावरू… आणि जिंकूच…
सर्वच महाराष्ट्रात परीक्षार्थी जोमाने अभ्यास करताय. आपण अभ्यासात व आपल्या नियोजनात काय वेगळे करतोय यावर बरचसं अवलंबून आहे. म्हणूनच आपणास योग्य मार्गदर्शन आणि नियोजनपूर्ण ‘Strategical Study Plan For Rajyaseva 2016’ देण्याचा आम्ही प्रयत्न करतोय.
मागील काही वर्षांपासूनचा Cut Off लक्षात घेता १४२-१४८ स्कोर हा Qualifying असू शकेल तर १५५+ Safe Score असू शकेल. हे मात्र एक अंदाज आहेत जे प्रश्नपत्रिकेनुसार बदलू शकतील. आपण १५५+ Score हेच ध्येय ठेवून आपल्या अभ्यासाची Strategy बनवावी.
उद्यापासून याविषयी मार्गदर्शनमाला सुरु करण्यात येईल. काही शंका असल्यास काही कॉमेंटमध्ये विचारा. अभ्यासासाठी शुभेच्छा…!!
To be continued…
पुढचा लेख – MPSC स्वरूप आणि Syllabus.
तुमच्या माहितीसाठी २०१५ ला झालेल्या राज्यसेवा पूर्व परीक्षेची Cut Off लिस्ट देत आहोत.
विद्यार्थी मित्रांनो यानंतरही तुमचे काही प्रश्न असल्यास खालील कॉमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. ‘मिशन एमपीएससी’ टीमद्वारे तुमच्या शंकांचं निरसन करण्यात येईल. नियमित अपडेट मिळवण्यासाठी लाईक करा आमचे फेसबुक पेज – Mission MPSC