• Become a Guest Writer
  • Copyright
  • Privacy Policy
  • Contact Us
Thursday, August 11, 2022
  • Login
Mission MPSC | MPSC PSI STI Exam Preparation
  • Home
  • MPSC
  • MPSC Current Affairs
  • Study Material
  • Jobs
  • Inspirational
No Result
View All Result
Mission MPSC | MPSC PSI STI Exam Preparation
No Result
View All Result

Current Affair 03 December 2018

Chetan Patil by Chetan Patil
December 3, 2018
in Daily Current Affairs
0
1 2
WhatsappFacebookTelegram

आजच्या दिवसाचे महत्त्व : भारताचे पहिले राष्ट्रपती यांची आज जयंती

  • ३ डिसेंबर या दिवशी भारताच्या इतिहासात चांगल्या-वाईट घटनांच्या नोंदी आहेत. आजच्या दिवशी भारताचा हॉकी जादूगार खेळाडू ध्यानचंद आणि प्रसिद्ध दिवंगत अभिनेते देव आनंद यांना आपण मुकलो आहोत. तर भारताचे पहिले राष्ट्राध्यक्ष, शिक्षणतज्ज्ञ आणि कुशल प्रशासक राजेंद्र प्रसाद यांचा आज जन्मदिवस.
  • देश आणि जगाच्या इतिहासात आजच्या दिवशी अनेक घटनांच्या नोंदी आहे. घेऊया आढावा…
  • 1829 : व्हाईसरॉय लॉर्ड विलियम बँटीक यांनी भारतातील सती प्रथेवर बंदी आणली.
  • 1884 : देशाचे पहिले राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद यांचा जन्म.
  • 1920 : तुर्की और आर्मेनिया यांनी केल्या होत्या शांती करारावर स्वाक्षऱ्या.
  • 1937 : भारतीय भाषातज्ज्ञ विनोद बिहारी वर्मा यांचा जन्म.
  • 1979 : हॉकीचे जादूगार ध्यानचंद यांचे निधन.
  • 1979 : इराणने स्वतंत्र इस्लाम संविधान तयार केला.
  • 1982 : भारताची महिला क्रिकेटपटू मिताली राज हिचा जन्म.
  • 2011 : बॉलिवूड अभिनेता देव आनंद यांचे निधन.

‘ट्रेन-18’ चाचणीत धावली ताशी 180 किमी वेगाने

  • देशातील पहिली विनाइंजिन रेल्वे ‘टी-१८’ची दुसरी यशस्वी चाचणी घेण्यात आली. या चाचणीत रेल्वेने वेगाचा नवा विक्रम प्रस्थापित केला. ताशी १८० किमी वेगाने कोटा ते सवाई माधोपूर मार्गावर ही रेल्वे धावली. या रेल्वेच्या पहिल्या चाचणीत टी-१८ ताशी १६० किमी वेगाने धावली होती.
  • या रेल्वेची निर्मिती चेन्नई येथील रेल्वेच्या कारखान्यात करण्यात आली आहे. यासाठी सुमारे १०० कोटी रुपये खर्च आला. १६ कोच असलेली ही रेल्वे पूर्ण वातानुकूलित आहे. रेल्वेच्या दोन्ही बाजूस एरो डायनामिक ड्रायव्हर केबिन आहेत.

लक्ष्य सेन, अश्मिताला विजेतेपद

  • टाटा खुल्या बॅडमिंटन स्पर्धेच्या अंतिम सामन्यांमध्ये भारताचा लक्ष्य सेन आणि अश्मिता चलिहाने बाजी मारत विजेतेपदाला गवसणी घातली. या विजयासह लक्ष्यने गत महिन्यातील कनिष्ठ जागतिक स्पर्धेच्या अंतिम फेरीत थायलंडच्या कुनलावत वितिदसरनकडून झालेल्या पराभवाचा वचपा काढला.
  • अवघ्या ३५ मिनिटात संपुष्टात आलेल्या या सामन्यात लक्ष्यने २१-१५, २१-१० अशी मात केली. तर महिला एकेरीमध्ये अश्मिताने वृषाली गुम्माडीवर २१-१६, २१-१३ असा विजय मिळवत विजेतेपदाचा मुकुट पटकावला. अवघ्या ३० मिनिटांत बाजी मारत अश्मिताने पहिल्या विजेतेपदावर शिक्कामोर्तब केले. तर पुरुष दुहेरीत सुमीत रेड्डी आणि अर्जुन एम. आर. यांनी मलेशियन जोडीवर मात करीत विजेतेपद पटकावले.

1 जानेवारीपासून नवीन शुल्क नाही; अमेरिका व चीनमध्ये सहमती

  • सध्या सुरू असलेली व्यापार भांडणे संपवण्याचे चीन व अमेरिका यांनी मान्य केले असून एक जानेवारीपासून कुणी कुणावर आयात कर वाढवून कुरघोडी करायची नाही, असे ठरवण्यात आले आहे. जी २० देशांच्या शिखर परिषदेच्या वेळी दोन्ही देशांनी व्यापार भांडणे मिटवण्यासाठी उपाययोजना करण्याचे ठरवले आहे. अमेरिका व चीन यांच्यातील व्यापार वाद शिगेला पोहोचला असून त्याचे फटके इतर देशांनाही बसत आहेत.
  • वेळी ट्रम्प यांनी सांगितले, की १ जानेवारी २०१९ पासून २०० अब्ज डॉलर्स किमतीच्या वस्तूंवरचा आयात कर हा १० टक्केच ठेवला जाईल तो २५ टक्के केला जाणार नाही. व्हाइट हाउसने भोजन बैठकीनंतर लगेच निवेदन जारी केले
  • अध्यक्ष क्षी जिनपिंग यांनी फेंटानाइल हे घातक रसायन अमेरिकेत विकणाऱ्या व्यक्तींवर चीन जबर कर आकारील असे मानवतावादी दृष्टिकोनातून जाहीर केले. आयात कर १० टक्क्य़ांवरू २५ टक्के करण्याचा प्रस्तावही रद्द करण्यात आल्याचे सांगून त्या म्हणाल्या, की चीनने अमेरिकेच्या वस्तू खरेदी करण्याचे मान्य केले आहे.

सुनील अरोरांनी सूत्रे स्वीकारली

  • राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी नियुक्त केलेले नवे मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा यांनी रविवारी पदाची सूत्रे हाती घेतली.
  • ते देशाचे २३ वे निवडणूक आयुक्त आहेत. त्यांनी ओ. पी. रावत यांच्याकडून सूत्रे हाती घेतली. अरोरा हे ऑक्टोबर २०२१ पर्यंत या पदावर राहणार आहेत. अरोरा यांची ३१ ऑगस्ट २०१७ रोजी निवडणूक आयुक्त म्हणून नियुक्ती झाली होती.
  • माहिती व प्रसारण, कौशल्य विकास व उद्योजकता मंत्रालय या खात्यात त्यांनी सचिव म्हणून काम केले होते. अरोरा हे १९८० च्या तुकडीतील भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकारी असून त्यांनी अर्थ, कापड उद्योग, नागरी हवाई वाहतूक या खात्यात सह सचिव म्हणून काम केले.
  • १९९९-२००० दरम्यान ते इंडियन एअरलाइन्सचे मुख्य व्यवस्थापकीय संचालक होते. राजस्थानमध्ये त्यांनी ढोलपूर, अलवर, नागौर, जोधपूर येथे काम केले असून ते १९९३-१९९८ दरम्यान मुख्यमंत्र्यांचे सचिव होते. २००५-२००८ दरम्यान ते मुख्यमंत्र्यांचे मुख्य सचिव होते.

देशाला ‘आधार’ देणारे अजय भूषण पांडे नवे अर्थ सचिव

  • देशाच्या अर्थ सचिवपदी अजय भूषण पांडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मावळते अर्थ सचिव हसमुख आधिया यांनी त्यांच्या कार्यालयात स्वागत केले.
  • पांडे हे महाराष्ट्र केडरच्या 1984 बॅचचे अधिकारी असून, आधार (युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया)चे (यूआयडीएआय) या सरकारच्या महत्वाकांक्षी प्रकल्पाचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कार्यरत आहेत.
Tags: chalu ghadamodiCurrent AffairsMPSC Current Affairs
SendShare121Share
Chetan Patil

Chetan Patil

Related Posts

Current Affairs 10 August 2022
Daily Current Affairs

MPSC Current Affairs : चालू घडामोडी 10 ऑगस्ट 2022

August 10, 2022
Current Affairs 9 August 2022
Daily Current Affairs

MPSC Current Affairs : चालू घडामोडी 09 ऑगस्ट 2022

August 9, 2022
Current Affairs 8 August 2022
Daily Current Affairs

MPSC Current Affairs : चालू घडामोडी 08 ऑगस्ट 2022

August 8, 2022

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Pandharpur

पंढरपूर नागरी सहकारी बँकेत 12 वी उत्तीर्णांना संधी.. असा करा अर्ज?

August 10, 2022
THDC

THDCIL Recruitment : नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशनमध्ये 109 जागांसाठी भरती

August 10, 2022
Defense Ministry

संरक्षण मंत्रालयांतर्गत मुंबईत ‘या’ पदासाठी भरती, 75,000 रुपये पगार मिळेल

August 10, 2022
SAI Recruitment

SAI : भारतीय क्रीडा प्राधिकरणामध्ये विविध पदांच्या 138 जागांसाठी भरती

August 10, 2022
Current Affairs 10 August 2022

MPSC Current Affairs : चालू घडामोडी 10 ऑगस्ट 2022

August 10, 2022
job

केंद्र सरकारच्या ‘या’ कंपनीमध्ये 396 जागांसाठी भरती, पदवीधरांना मोठी संधी..

August 9, 2022
ADVERTISEMENT
  • Become a Guest Writer
  • Copyright
  • Privacy Policy
  • Contact Us

© 2015-2019 Mission MPSC. Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • MPSC
  • MPSC Current Affairs
  • Study Material
  • Jobs
  • Inspirational

© 2015-2019 Mission MPSC. Powered By Tech Drift Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Join WhatsApp Group