आयबी, सीबीआय, रॉमध्ये होणार फेरबदल, हालचालींना वेग
- लवकरच पंतप्रधान कार्यालय (पीएमओ)आणि टॉपच्या तीन गुप्तचर व तपास संस्थांमध्ये मोठे फेरबदल अपेक्षित आहेत. रॉ, आयबी आणि सीबीआय या संस्थांमध्ये प्रमुख पदाच्या व्यक्तींचा शोध सुरू आहे.
- उच्चसूत्रांनी सांगितले की, ३० नोव्हेंबर रोजी अर्थ व महसूल सचिव हसमुख अधिया सेवानिवृत्त होत आहेत. त्यांना ओएसडी म्हणून पुन्हा घेतले जाऊ शकते. सार्वत्रिक निवडणुकीपर्यंत त्यांना मुदतवाढ मिळू शकते. अर्थ मंत्रालयातील व्यवस्था सरकार विस्कळीत करू इच्छित नाही. कॅबिनेट सचिव पदासाठीही त्यांचे नाव चर्चेत होते. मात्र, मोदी यांनी त्यांची नियुक्ती अर्थ मंत्रालयात केली. दरम्यान, १९८५ च्या बॅचचे आयएएस अधिकारी असलेले जी. सी. मुर्मू यांना महसूल सचिव केले जाऊ शकते.
- रिसर्च अँड अॅनालिसिस विंगचे (सचिव अनिल धस्माना जानेवारीत निवृत्त होत आहेत. रॉमध्ये दोन नंबरवर असलेल्या समत कुमार गोयल यांच्या नावाचा विचार पदोन्नतीसाठी होत होता. मात्र, अस्थाना प्रकरणाशी संबंधित सीबीआय वादात त्यांचे नाव आल्यानंतर त्यांच्या पदोन्नतीबाबत अनिश्चितता आहे.
- आयबीचे संचालक राजीव जैन जानेवारीत निवृत्त होणार आहेत.तेथील विशेष संचालक अरविंद कुमार हे त्यांचे उत्तराधिकारी होऊ शकतात. ते आसामच्या १९८४ च्या बॅचचे अधिकारी आहेत.
- आलोक वर्मा यांना सीबीआयमध्ये पुन्हा आणले तरी ते १ फेब्रुवारी २०१९ रोजी निवृत्त होतील. या पदासाठी क्रमांक दोनचे अधिकारी राकेश अस्थाना हे स्पर्धेत आहेत. बीएसएफचे प्रमुख रजनीकांत मिश्रा आणि महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक व दिल्लीचे पोलीस आयुक्त अमुल्य पटनायक हे या पदासाठी स्पर्धेत आहेत.
स्वदेशी आण्विक पाणबुडी आयएनएस अरिहंतची
पहिली गस्त मोहीम यशस्वी
- आण्विक अस्त्रांनी सज्ज पहिल्या स्वदेशी बनावटीच्या आयएनएस अरिहंत या पाणबुडीची पहिली गस्त मोहीम सोमवारी यशस्वी झाली. यासोबतच जमीन, आकाश आणि समुद्रात आण्विक हल्ले करण्याची संपूर्ण क्षमता भारताने मिळवली आहे. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अरिहंतच्या यशाबद्दल चालक दलासह अधिकाऱ्यांचे अभिनंदन केले.
- जमीन, आकाश, समुद्रात हल्ल्यांची क्षमता; आण्विक त्रिकोण साधला
- ही क्षमता मिळवणारा भारत सहावा. त्याआधी रशिया, अमेरिका, ब्रिटन, फ्रान्स,चीन.
- ६ हजार टन वजन, विशाखापट्टणममध्ये बांधणी.
- ७५० किमी ते ३५०० किमी मारक क्षमतेची क्षेपणास्त्रे